For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोमांचक विजयासह ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका

06:59 AM Aug 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
रोमांचक विजयासह  ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका
Advertisement

तिसऱ्या टी 20 सामन्यात आफ्रिकेचा पराभव : सामनावीर मॅक्सवेलची 62 धावांची खेळी : टीम डेव्हिड मालिकावीर

Advertisement

वृत्तसंस्था / क्वीन्सलँड (ऑस्ट्रेलिया)

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या तिसऱ्या व अखेरच्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सनी रोमांचक असा विजय मिळवला. विजयासाठी शेवटच्या षटकांत 10 धावांची गरज असताना मॅक्सवेलने पहिल्या दोन चेंडूंत (2 व 4) मॅक्सवेलने 6 धावा जोडल्या. पण, त्यानंतर पुढील दोन चेंडू निर्धाव गेल्याने 2 चेंडूंत 4 धावा असा सामना अटीतटीचा आला. मॅक्सवेलने फटके चांगले खेचले होते, परंतु एक धाव घेण्यास त्याने नकार दिला. पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने विचित्र फटका मारुन सामन्याचे चित्र बदलले आणि कांगारुंनी मालिकेत 2-1 ने बाजी मारली. मालिकेत फार कमाल न करु शकलेल्या मॅक्सवेलने 1 चेंडू व 2 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाला थरारक विजय मिळवून दिला.

Advertisement

प्रारंभी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात काही खास झाली नाही. कर्णधार एडन मार्करम (1) व रायन रिकेल्टन (13) हे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ड्रे प्रेटोरियसने 24 धावांचे योगदान दिले. त्याला नॅथन एलिसने तंबूचा रस्ता दाखवला.

ब्रेव्हिसचे आक्रमक अर्धशतक

यानंतर, युवा फलंदाज ब्रेव्हिसने 26 चेंडूत 53 धावांची वादळी खेळी केली. यासह, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद टी-20 अर्धशतक झळकावणारा फलंदाज देखील बनला आहे. ब्रेव्हिसने 22 चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केले. या खेळी दरम्यान त्याने 6 षटकार आणि 1 चौकार मारला. त्याआधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आफ्रिकेच्या जेपी ड्युमिनीच्या नावावर जमा होता. ड्युमिनीने 31 चेंडूत ही कामगिरी करून दाखवली होती. ब्रेव्हिस 26 चेंडूंत 1 चौकार व 6 षटकारांसह 53 धावांवर बाद झाला. त्याला ट्रिस्टन स्टब्जने चांगली साथ दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. नॅथन एलिसने ब्रेव्हिसला ग्लेन मॅक्सवेल याच्या हाती 12 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर कॅच आऊट केले. यानंतर रॅसी व्हॅन डेर ड्युसेनने मोर्चा सांभाळला आणि नाबाद 38 धावा करताना संघाला 7 बाद 172 धावांपर्यंत पोहोचवले.

मॅक्सवेलची रोमांचक खेळी अन् कांगारूंचा शेवटच्या चेंडूवर विजय

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला कर्णधार मिचेल मार्श व ट्रॅव्हिस हेड यांनी 66 धावांची सलामी दिली. हेड 19 धावांवर बाद झाला. त्यानंतर जोश इंग्लिस (0), कॅमेरून ग्रीन (9) व टीम डेव्हिड (17) हे स्वस्तात बाद झाले. कर्णधार मार्शने अर्धशतकी खेळी साकारताना 37 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारासह 54 धावांची खेळी साकारली. मार्श बाद झाल्यानंतर आरोन हार्डी (1), बेन डॉरशूई (1) व नॅथन एलिस (0) यांच्या विकेट्स घेऊन आफ्रिकेने सामना खेचून आणला होता. पण, अष्टपैलू मॅक्सवेलने तुफानी खेळी साकारताना संघाला रोमांचक असा विजय मिळवून दिला. त्याने 36 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 62 धावांची नाबाद खेळी साकारली. मॅक्सवेलच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 19.5 षटकांत 8 बाद 173 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 7 बाद 172 (रिकेल्टन 13, ड्रे प्रिटोरियस 24, डेवाल्ड ब्रेव्हिस 53, ड्युसेन नाबाद 38, नॅथन एलिस 3 बळी, हेजलवूड आणि झम्पा प्रत्येकी दोन बळी)

ऑस्ट्रेलिया 19.5 षटकांत 8 बाद 173 (मिचेल मार्श 54, टॅव्हिस हेड 19, टीम डेव्हिड 17, ग्लेन मॅक्सवेल नाबाद 62, कॉर्बिन बॉश तीन बळी, रबाडा आणि मफाफा प्रत्येकी 2 बळी).

 डेवाल्ड ब्रेव्हिसचा आणखी एक कारनामा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकासह आफ्रिकन युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिसने आणखी एका मोठ्या कामगिरीला गवसणी घातली आहे. ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकले आहे. अशी कामगिरी करताना त्याने इंग्लंडच्या रवी बोपाराला पिछाडीवर टाकले आहे. बोपाराने 2014 मध्ये होबार्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 चेंडूत अर्धशतक झळकावलत ही कामगिरी केली होती. तर ब्रेव्हिसने हा विक्रम मोडत 22 चेंडूत ही कामगिरी करून दाखवली आहे.

Advertisement
Tags :

.