कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलिया जादा कसोटी खेळणार

06:36 AM Dec 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / मेलबोर्न

Advertisement

पुढील वर्षी विंडीज विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ आणखी एक जादा कसोटी सामना खेळणार असल्याचे येथील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. विंडीजमध्ये कसोटी क्रिकेटला अधिक प्राधान्य मिळावे यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आणखी एक जादा कसोटी खेळण्याची तयारी दर्शविली आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलिया आणि विंडीज यांच्यात पुढील वर्षी तीन सामन्यांची कसोटी मालिका  होणार आहे. उभय संघातील ही कसोटी मालिका फ्रँक वॉरेल चषकासाठी राहील. यापूर्वी म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाने 2015 साली विंडीजचा दौरा केला होता. मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने जमैका आणि डॉम्नीसिया येथील कसोटी सामने जिंकले होते. पण 2024 पासून ऑस्ट्रेलियाने विंडीजबरोबर कसोटी मालिका खेळलेली नाही. आता विंडीजचा संघ पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येणार असून उभय संघात दोन कसोटी सामने खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा 3 जानेवारीपर्यंत राहिल.

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media#sports
Next Article