डब्ल्यूटीसी फायनलसाठी ऑस्ट्रेलिया संघ घोषित
सलामीवीर सॅम कॉन्स्टास, अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन यांचा समावेश
वृत्तसंस्था/ मेलबर्न
पुढील महिन्यात लंडनमध्ये दक्षिण आफ्रिकेविऊद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय संघात सलामीवीर सॅम कोन्स्टास आणि तंदुऊस्त झालेला अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन यांना स्थान मिळाले आहे. पॅट कमिन्स आणि त्यांचे खेळाडू सदर प्रतिष्ठित जेतेपद राखण्याचे लक्ष्य ठेवून अंतिम सामन्यात उतरतील. 11 ते 15 जूनदरम्यान लॉर्ड्सवर हा सामना होईल.
संघ निवडीत फारसे आश्चर्यकारक असे पैलू नाहीत. संघ जवळजवळ या वर्षाच्या सुऊवातीला भारत आणि नंतर श्रीलंकेविऊद्ध झालेल्या सामन्यांसाठीच्या संघासारखाच आहे. या संघाने श्रीलंकेत प्रभावी मालिका विजय मिळवून आणि दशकात पहिल्यांदाच भारताला पराभूत करून जागतिक स्पर्धेची फेरी संपवली, याकडे निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी लक्ष वेधले. ऑस्ट्रेलियाने दोन वर्षांच्या कालावधीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि आता आम्हाला जागतिक कसोटी स्पर्धेचे अजिंक्यपद राखण्याची संधी मिळाली आहे. अंतिम फेरीत पोहोचणे या संघासाठी खूप अर्थपूर्ण आहे आणि लॉर्ड्सवर दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा सामना करण्यास ते खूप उत्सुक आहेत, असे ते पुढे म्हणाले.
संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर कोन्स्टासला श्रीलंकेच्या दौऱ्यातून मायदेशी पाठवण्यात आले होते आणि तो न्यू साउथ वेल्सकडून खेळत होता. त्याने मेलबर्नमधील चौथ्या कसोटीत भारताविऊद्ध रोमांचक पदार्पण केले होते, परंतु नंतर तो लय कायम ठेवू शकला नाही. दुसरीकडे गेल्या वर्षी पाठीच्या दुखापतीला तोंड देण्याची पाळी ग्रीनवर येऊन त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली होती. फिरकी गोलंदाज मॅट कुहनेमनला नॅथन लायनसाठी ‘बॅकअप’ म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे, तर ब्रेंडन डॉगेटला राखीव खेळाडू बनविण्यात आले आहे.
त्यानंतर हाच संघ 25 जूनपासून बार्बाडोस, ग्रेनाडा आणि जमैका येथे होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजला जाईल. दुखापतींमुळे श्रीलंकेविऊद्धच्या कसोटी मालिकेतून आणि त्यानंतरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडलेले कमिन्स आणि जोश हेझलवूड हे इंडियन प्रीमियर लीगमध्ये यशस्वीरीत्या पुनरागमन केल्यानंतर संघात परतले आहेत. संघात मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँड हे उर्वरित वेगवान गोलंदाज आहेत. यापैकी कुणाला दुखापत झाल्यास डॉगेटचा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असेल.
संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुहनेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन.