भारतीय महिलांपुढे आज ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
महिला विश्वचषकातील आज रविवारी येथे होणाऱ्या सामन्यात भारताला रणनीतीच्या दृष्टीने लवचिक राहावे लागेल आणि विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाविऊद्ध सहाव्या गोलंदाजाचा पर्याय जोडण्याचा विचार करावा लागेल. गुऊवारी दक्षिण आफ्रिकेविऊद्ध तीन गड्यांनी झालेल्या पराभवामुळे सर्व परिस्थितीत पाच गोलंदाजांवर अवलंबून राहण्याच्या मर्यादा उघड झाल्या.
सहाव्या गोलंदाजाच्या अनुपस्थितीत कर्णधार हरमनप्रीत कौरला तिच्या कामचलावू ऑफस्पिनकडे वळावे लागले. परंतु 40 व्या षटकानंतर दक्षिण आफ्रिकेने वेगवान गोलंदाजांना लक्ष्य केल्यावर यजमान संघाकडे पर्यायच राहिला. क्रांती गौड आणि अमनजोत कौर यांनी 47 व्या आणि 49 व्या षटकात 12 चेंडूंत 30 धावा दिल्या आणि दक्षिण आफ्रिकेने 252 धावांचे लक्ष्य ओलांडले. सध्याच्या भारतीय संघात दोन उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाज (गौड, कौर), दोन ऑफस्पिनर (दीप्ती शर्मा, स्नेह राणा) आणि एक डावखुरी फिरकी गोलंदाज (श्रीचरणी) आहे. जर एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवरील खेळपट्टी अपेक्षेप्रमाणे राहिली, तर मजबूत ऑस्ट्रेलियन फलंदाजी या एकांगी आक्रमणाला सहजपणे तोंड देऊ शकते.
जर पुन्हा संकट आले, तर भारताला सहाव्या गोलंदाजाची आवश्यकता भासेल आणि हरमनप्रीतची कामचलावू फिरकी गोलंदाजी ही ऑस्ट्रेलियासारख्या संघासाठी आयतीच संधी बनेल. त्यांच्याकडे अॅश्ले गार्डनर, अॅलिसा हीली, एलिस पेरी आदी कुशल फलंदाज आहेत. परंतु सहाव्या गोलंदाजाची निवड करणे देखील सोपे नाही. भारताची संघ अतिरिक्त फिरकी गोलंदाज जोडणे पसंत करू शकतो. कारण नॅडिन डी क्लार्कने सांगितलेले आहे की, दक्षिण आफ्रिकेने भारतीय वेगवान गोलंदाजांना लक्ष्य केले. कारण फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून काही प्रमाणात मदत मिळू शकली होती.
भारताकडे अनुभवी राधा यादवच्या रूपात डावखुरी फिरकी गोलंदाज आहे, जी खालच्या फळीतील एक उपयुक्त फलंदाजही आहे. राणाच्या जागी तिला आणण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडे दोन डावखुऱ्या फलंदाज आहेत. यात बेथ मुनीने आणि सलामीवीर फोबी लिचफिल्ड यांचा समावेश होतो. बेथ मुनीने मागील सामन्यात पाकिस्तानविऊद्ध शतक झळकावले. त्यामुळे ऑफस्पिनर्सना ठेवण्याकडे भारताचा कल राहू शकतो. भारत कदाचित अमनजोतऐवजी वेगवान गोलंदाज अऊंधती रे•ाrला संधी देऊ शकतो, पण त्यामुळे खालच्या फळीतील फलंदाजीची ताकद कमी होईल.
हरलीन देओलच्या जागी यादवला संधी देण्याचा विचारही भारत करू शकतो, परंतु त्यामुळे आधीच खराब कामगिरी केलेल्या वरच्या फळीची बरीच ताकद कमी होईल. या स्पर्धेत भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांचा संघर्ष ही चिंतेची बाब बनलेली आहे. सात वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना, हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांना मोठे योगदान देणे भाग आहे. विशेषत: मानधनाला तिचा खेळ वर्ल्ड कपपूर्वीच्या पातळीवर न्यावा लागेल. तिच्या कमकुवत कामगिरीचा संघाला फटका बसलेला असून 18 च्या सरासरीने तिला तीन सामन्यांमध्ये केवळ 54 धावा काढता आलेल्या आहेत.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.