ऑस्ट्रेलियाला बांगलादेशविरुद्ध आणखी एका मोठ्या विजयाचे वेध
विशाखापट्टणम
एलिस पेरीच्या तंदुऊस्तीवर लक्ष ठेवतानाच गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियाला आज गुऊवारी महिला विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशवर आणखी एक मोठा विजय मिळविण्याच्या प्रयत्नात असेल.
ऑस्ट्रेलिया कोलंबोमध्ये श्रीलंकेविऊद्धच्या पावसामुळे रद्द झालेल्या एका सामन्यासह चार सामन्यांमध्ये तीन विजय आणि सात गुण नोंदवून विश्वचषक गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि मागच्या सामन्यात त्यांनी सह-यजमान भारतावर तीन गडी राखून विजय मिळविलेला आहे. स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या फॉर्मबद्दल काही शंका असल्यास एलिसा हिलीच्या संघाने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये विश्वविक्रमी लक्ष्याचा पाठलाग करून अशा कोणत्याही शंका दूर केल्या आहेत आणि आठव्या जगज्जेतेपदाच्या आपण भक्कम दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे.
हिलीने त्या सामन्यात कर्णधारास साजेशी कामगिरी करताना 102 चेंडूंत 21 चौकार आणि तीन षटकारांसह 142 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने एक षटक शिल्लक असताना 7 बाद 331 धावा केल्या. यामुळे यजमान संघ विचारात पडला असून स्पर्धेतील इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. पेरीने षटकार खेचून ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. मात्र त्यापूर्वी पेटके आल्याने तिला क्रीझ सोडावी लागली.
प्रेक्षकांना अचंबित करताना तिने डॉ. वाय. एस. राजशेखर रे•ाr एसीए-व्हीडीसीए स्टेडियमच्या पार्किंग लॉटमध्ये धावण्याचा सराव केला आणि नंतर क्रिझवर परतून काम पूर्ण केले, परंतु ऑस्ट्रेलियाला त्यांच्या या महत्त्वाच्या खेळाडूला अशा कोणत्याही अडचणी भेडसावलेल्या नको आहेत. कारण संघ शेवटी त्यांच्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये पोहोचण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे. ऑस्ट्रेलियाने येथे फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर 330 धावा दिलेल्या असल्याने आपली गोलंदाजी सुधारण्यास ते उत्सुक असतील.
अनेक वेळा विश्वचषक विजेता राहिलेल्या या संघाच्या तिन्ही पूर्ण झालेल्या सामन्यांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे आणि बांगलादेशविऊद्धचा सामना तुलनेने सोपा असावा अशी त्यांची इच्छा असेल. परंतु आत्मसंतुष्टतेला येथे जागा नाही. स्पर्धेतील जवळजवळ इतर सर्व संघ आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे कौशल्य यात मोठी तफावत असली, तरी बांगलादेशने त्यांच्या मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेला चांगली झुंज दिली आणि शेवटी केवळ तीन गडी राखून त्यांना पराभव पत्करावा लागला या वस्तुस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाला सावधगिरी बाळगावी लागेल.
दक्षिण आफ्रिकेविऊद्ध माऊफा अख्तर गोलंदाजीत उत्कृष्ट लयीत दिसली नसली, तरी बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने फिरकी गोलंदाजांना वापरण्याच्या बाबतीत कुशल कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेतील महिला संघाला धावांसाठी कठोर परिश्रम करावे लागले. त्यांनी फक्त तीन चेंडू आणि तितकेच फलंदाज शिल्लक असताना विजय मिळवला. न्यूझीलंडविऊद्धच्या 100 धावांच्या पराभवानंतर बांगलादेशने प्रभावी पुनरागमन केले. शर्मिन अख्तर (50 धावा) आणि शोर्ना अख्तर (नाबाद 51) यांच्या अर्धशतकांच्या मदतीने त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 232 धावा केल्या. ही धावसंख्या दक्षिण आफ्रिकेसारख्या मजबूत संघाविऊद्ध जवळजवळ पुरेशी ठरली. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश दोघांनाही माहित असेल की, या ठिकाणी धावा मुबलक निघू शकतात आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारून दबाव आणण्याचा प्रयत्न करेल.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.