महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलियाचा लंकेवर 6 गड्यांनी विजय

06:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘सामनावीर’ मेगान स्कूटचे 12 धावांत 3 बळी, लंकेचा सलग दुसरा पराभव

Advertisement

वृत्तसंस्था / शारजा

Advertisement

2024 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे अ गटातील झालेल्या सामन्यात विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 6 गड्यांनी दणदणीत पराभव करत आपल्या मोहीमेला शानदार प्रारंभ केला. या स्पर्धेतील लंकेचा हा दुसरा पराभव आहे. 12 धावांत 3 गडी बाद करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मेगान स्कूटला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेने 20 षटकात 7 बाद 93 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 14.2 षटकात 4 बाद 94 धावा जमवित हा सामना 34 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी आरामात जिंकला.

लंकेच्या डावामध्ये निलाक्षीका सिलव्हाने 40 चेंडूत नाबाद 29 तर हर्षिता समरविक्रमाने 35 चेंडूत 2 चौकारांसह 23, संजीवनीने 15 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. लंकेच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. लंकेला 13 अवांतर धावा मिळाल्या. लंकेच्या डावात एकूण 4 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे मेगान स्कूटने 12 धावांत 3, मॉलिन्युक्सने 20 धावांत 2 तर वेरहॅम, गार्डनर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 23 धावा जमविताना 2 गडी गमविले. लंकेचे अर्धशतक 70 चेंडूत फलकावर लागले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 14.2 षटकात विजयाचे उद्दिष्ट पार केले. सलामीच्या बेथ मुनी 38 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 43, कर्णधार हिलीने 1 चौकारांसह 4, वेरहॅम 3, इलेसीपेरीने 15 चेंडूत 3 चौकारांसह 17, गार्डनरने 15 चेंडूत 1 चौकारांसह 12 आणि लिचफिल्डने 1 चौकारांसह नाबाद 9 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 10 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 35 धावा जमविताना 3 गडी गमविले. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 46 चेंडूत नोंदविले गेले. 10 षटकाअखेर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 62 धावा जमविल्या होत्या. लंकेतर्फे प्रभोदिनी, रणवीरा, सुगंधीका कुमारी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : लंका 20 षटकात 7 बाद 93 (निलाक्षीका सिलव्हा नाबाद 29, समरविक्रमा 23, संजीवनी 16, अवांतर 13, मेगान स्कूट 3-12, मॉलिन्युक्स 2-20, गार्डनर, वेरहॅम प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 14.2 षटकात 4 बाद 94 (मुनी नाबाद 43, हिली 4, वेरहॅम 3, पेरी 17, गार्डनर12, लिचफिल्ड नाबाद 9, अवांतर 6, प्रभोदिनी, रणवीरा, सुगंधीका कुमारी प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article