ऑस्ट्रेलिया, अफगाणसमोर आज उपांत्य फेरीचे लक्ष्य
वृत्तसंस्था/लाहोर
क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऑस्ट्रेलियाची गाठ आज शुक्रवारी येथे होणाऱ्या सामन्यात वेगाने अव्वल संघांमधील आपले स्थान पक्के करणाऱ्या अफगाणिस्तान संघाशी पडेल. बुधवारी गद्दाफी स्टेडियमवर इंग्लंडवर मिळविलेला संस्मरणीय विजय साजरा करण्यात अफगाणिस्तान संघ मग्न आहे. अफगाणिस्तानने अमेरिकेत झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम चार संघाच्या टप्प्यात प्रवेश केला होता. त्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत आणखी एका जागतिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची त्यांना ांधी आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा विजय स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील त्यांचा प्रवेश निश्चित करेल, तर अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आणेल.
प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला माहीत आहे की, त्यांची ताकद फलंदाजीमध्ये आहे, ज्यात ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि ग्लेन मॅक्सवेलसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. विरोधी गोलंदाजीचे भरपूर नुकसान करण्यास ते सक्षम आहेत. नियमित खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघ कमकुवत झाला आहे यात शंका नाही, परंतु त्यामुळे तरुण खेळाडूंना प्रभावित करण्याची, संघातील त्यांचे स्थान मजबूत करण्याची आणि एका प्रमुख स्पर्धेत समृद्ध ऑस्ट्रेलियन वारसा पुढे नेण्याची संधी मिळाली आहे.
►अफगाणिस्तान : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झद्रान, रहमानउल्ला गुरबाज, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, इक्रम अलीखिल, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशिद खान, नांग्याल खरोती, नूर अहमद, फजलहक फारूकी, फरिद मलिक, नविद झद्रान, राखीव : दरविश रसुली, बिलाल सामी.
►ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, बेन द्वारशुईस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, एरॉन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, एडम झॅम्पा.
सामन्याची वेळ : दुपारी 2.30 वा.