For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलिया अ महिला संघ विजयी

06:38 AM Aug 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलिया अ महिला संघ विजयी
Advertisement

भारत अ महिला संघ पाच गड्यांनी पराभूत, अॅमी एडगरचे 5 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

रविवारी येथे झालेल्या चार दिवसांच्या अनधिकृत एकमेव कसोटी सामन्यात खेळाच्या शेवटच्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ महिला संघाचा 6 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघातील फिरकी गोलंदाज अॅमी एडगरने 5 गडी बाद केले. तर अनिका लिरॉईड आणि रॅचेल ट्रेनमन व मॅडी ड्रेक यांनी शानदार अर्धशतके झळकवली.

Advertisement

या सामन्यात भारत अ महिला संघाने पहिल्या डावात 299 धावा जमविल्यानंतर ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने पहिल्या डावात 305 धावा जमवित 6 धावांची नाममात्र आघाडी मिळवली. त्यानंतर भारत अ महिला संघाने दुसऱ्या डावात 286 धावा जमवित ऑस्ट्रेलिया अ महिला संघाला विजयासाठी 281 धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने 85.3 षटकात 4 बाद 283 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी जिंकला.

भारत अ महिला संघाने 8 बाद 260 या धावसंख्येवरुन शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांच्या शेवटच्या 2 गड्यांनी 26 धावांची भर घातली. राघवी बिस्तने 86 तर शेफाली वर्माने 52 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया अ संघातील एडगरने 57 धावांत 5 गडी बाद केले. ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने दुसऱ्या डावाला आक्रमक सुरुवात केली. ट्रेनमन आणि कर्णधार ताहिला विल्सन यांनी सलामीच्या गड्यासाठी 117 धावांची शतकी भागिदारी केली. विल्सनने 46 धावा जमविल्या. भारत अ महिला संघातील वेगवान गोलंदाज सायमा ठाकुरने आपल्या पाठोपाठच्या 2 षटकात ऑस्ट्रेलिया अ महिला संघातील 2 फलंदाजांना बाद केले. ठाकुरने विल्सनला तर त्यानंतर ट्रेनमनला यष्टीरक्षक कश्यपकरवी झेलबाद केले. ड्रेक आणि लिरॉईड या जोडीने 136 धावांची शतकी भागिदारी करत आपल्या संघाला 6 गड्यांनी विजय मिळवून दिला. लिरॉईडने 72 तर ट्रेनमनने 64 आणि ड्रेकने 68 धावा जमविल्या. 85.3 षटकात ऑस्ट्रेलिया अ संघाने 4 बाद 283 धावा जमवित विजय हस्तगत केला. सायमा ठाकुरने 63 धावांत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक - भारत अ प. डाव 299, ऑस्ट्रेलिया अ प. डाव सर्वबाद 305, भारत अ दु. डाव 81 षटकात सर्वबाद 286 (शेफाली वर्मा 52, बिस्त 86, एडगर 5-57), ऑस्ट्रेलिया अ. दु. डाव 85.3 षटकात 4 बाद 283 (विल्सन 46, लिरॉईड 72, ड्रेक 68, ट्रेनमन 64, सायमा ठाकुर 2-63).

Advertisement
Tags :

.