कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलिया अ संघ 242 धावांनी आघाडीवर

06:38 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत अ चा डाव 194 धावांत आटोपला, साई सुदर्शनचे अर्धशतक, थॉर्नटनचे 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

भारत अ व ऑस्ट्रेलिया अ संघांत सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया अ संघाने दिवसअखेर 3 बाद 16 धावा जमवित भारत अ संघावर 242 धावांची आघाडी घेतली आहे. नाथन मॅकस्वीनी 11 धावांवर खेळत होता.

या दोन संघांतील पहिली कसोटी अनिर्णीत राहिली होती. ऑस्ट्रेलिया अ ने पहिल्या या कसोटीच्या पहिल्या दिवशी 5 बाद 390 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला त्यांनी प्रारंभ केला आणि त्यात आणखी 30 धावांची भर घातल्यानंतर त्यांचा पहिला डाव  420 धावांत आटोपला. त्यांच्या डावात सॅम कोन्स्टासने 49, मॅकस्वीनीने 74, जॅक एडवर्ड्सने 78 चेंडूत 88, टॉम मर्फीने 76, जोश फिलिपने 39, हेन्री थॉर्नटनने नाबाद 32, ऑलिव्हर पीकेने 29 धावा जमविल्या. भारत अ तर्फे मानव सुतारने 5, गुरनूर ब्रारने 75 धावांत 3, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांनी एकेक बळी टिपला.

भारत अ संघाची सुरुवात मात्र खराब झाली. 27 धावा झाल्या असताना केएल राहुल 11 धावांवर बाद झाल्यानंतर नारायण जगदीशन व साई सुदर्शन यांनी 32 धावांची भर घातल्यानंतर जगदीशनही 38 धावांवर बाद झाला. यानंतर मात्र भारत अ चा डाव गडगडला आणि 1 बाद 39 अशा स्थितीनंतर त्यांची 5 बाद 75 अशी घसरगुंडी उडाली. आयुष बदोनी 126 धावसंख्येवर बाद झाला. साई सुदर्शनसमवेत त्याने सहाव्या गड्यासाठी 51 धावांची भर घातली. बदोनीने 35 चेंडूत 21 धावा केल्या. सुदर्शनने नंतर सिराजच्या साथीने 37 धावांची भर घातल्यानंतर नवव्या गड्याच्या रूपात साई सुदर्शन बाद झाला आणि 53 व्या षटकांत ब्रार बाद झाल्यानंतर भारत अ चा डाव 194 धावांत आटोपल्याने ऑस्ट्रेलिया अ संघाला पहिल्या डावात 226 धावांची भक्कम आघाडी मिळाली. साई सुदर्शनने 140 चेंडूत सर्वाधिक 75 धावा जमविल्या. त्यात 6 चौकार, एका षटकाराचा समावेश होता. थॉर्नटनने 36 धावांत 4, टॉड मर्फीने 2 व सदरलँड, रॉक्चिसिओली, कोनोली यांनी एकेक बळी मिळविले.

भारताप्रमाणे ऑस्ट्रेलिया अ चीही दुसऱ्या डावात खराब सुरुवात झाली आणि 7.5 षटकांतच 3 बाद 16 अशी त्यांची स्थिती झाली. कोन्स्टास 3, केलावे 0, पीके 1 धाव काढून बाद झाले. मॅकस्वीनी 11 धावांवर खेळत आहे. ब्रार, सिराज व मानव सुतार यांनी एकेक बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया अ प.डाव 420, भारत अ प.डाव 194 (राहुल 11, जगदीशन 38, साई सुदर्शन 75, आयुष बदोनी 21, प्रसिद्ध कृष्णा 16, अवांतर 27. हेन्री थॉर्नटन 4-36, मर्फी 2-48), ऑस्ट्रेलिया अ दुसरा डाव 7.5 षटकांत 3 बाद 16 (मॅकस्वीनी खेळत आहे 11, सुतार 1-0, ब्रार 1-9, सिराज 1-6).

प्रसिद्ध कृष्णा जखमी

भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला फलंदाजी करताना चेंडू हेल्मेटला लागल्यानंतर भोवळ आल्याने त्याला मैदान सोडावे लागले. 39 व्या षटकावेळी हेन्री थॉर्नटनचा चेंडू लागल्याने त्याची कन्कशन चाचणी घेण्यात आली. कृष्णाने नंतर खेळ पुढे चालू ठेवला. पण तीन षटकानंतर त्याने मैदान सोडले, त्यावेळी त्याने 16 धावा जमविल्या होत्या. त्याची कन्कशन बदली खेळाडू म्हणून विदर्भचा यश ठाकुर फलंदाजीस आला होता. कृष्णा व्यवस्थित असून त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्याच्याबाबत उद्या निर्णय घेतला जाईल, असे संघातील सूत्रांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article