Solapur : टाकळी ल. च्या सरपंचपदी औदुंबर ढोणे; उपसरपंचपदी देठे !
गुलाल उधळत टाकळी (लक्ष्मी) ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष
टाकळी : पंढरपूर तालुक्यातील टाकळी (लक्ष्मी) येथील ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यामध्ये सरपंच व उपसरपंच निवडी करण्यात आल्या. सरपंचपदाची निवड बिनविरोध करण्यात आली. सरपंचपदी औदुंबर ढोणे तर उपसरपंचपदी समाधान देठे यांची निवड करण्यात आली.
उपसरपंच पदाचे मतदान गुप्त पद्धतीने झाले. उपसरपंच पदासाठी २ जणांनी फॉर्म भरला होता यामध्ये १७ मतांपैकी विरोधी गटाला ६ तर देठे यांना ११ मते पडले. असता ते विजयी घोषित झाले. यामध्ये परिचारक-आवताडे गटाचा झेंडा टाकळी (लक्ष्मी) ग्रामपंचायतीवर लागलेला दिसून येत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण उपस्थित होते. तर ग्राम महसूल अधिकारी किरण बडीवले, ग्रामसेवक जयंत खंडागळे यांच्याकडून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. निवडीनंतर मिरवणूक काढत गुलालाची उधळण करण्यात आली.
यावेळी जि.प.सदस्य. रामदास आप्पा ढोणे, परमेश्वर देठे, बापूसाहेब कदम, तंटामुक्त अध्यक्ष शंभूराजे कदम, सुरेश टिकोरे, आबासो पवार, महादेव देठे, माऊली देशमुख, अनिल सोनवणे, नंदकुमार बाघमारे, संदीप मांडवे, विकास देवकते, सचिन बाळके, महादेव पवार, सागर कारंडे, सागर सोनवणे, शहाजी कांबळे, बाळासाहेब खपाले, धनाजी जाधव, गोवर्धन देठे, अंकुश ढोणे, भाऊसाहेब ढोणे, बापू उकरंडे आदी उपस्थित होते.