मार्च तिमाहीत ऑडीची कार विक्री दुप्पट
जानेवारी ते मार्च दरम्यानची आकडेवारी जाहीर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चालू वर्षात जानेवारी ते मार्च तिमाहीत लक्झरी कार कंपनी ऑडी इंडियाची विक्री दुपटीने वाढून 1,950 युनिट्सवर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 862 वाहनांची विक्री केली होती.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर ढिल्लॉन यांनी एका निवदेनात म्हटले आहे की, आमच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये सध्या 16 मॉडेल्स आहेत. यापैकी सर्वात मजबूत एसयूव्ही पोर्टफोलिओ आहे. जो कंपनीच्या एकूण विक्रीच्या 60 टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती आहे. याचाच अर्थ कंपनीच्या एसयुव्ही गटातील कार्सना ग्राहकांनी मोठी पसंती दर्शवली आहे, असा होतो.
यावेळी ढिल्लॉन म्हणाले की सध्याच्या क्यू 3 आणि क्यू 3 स्पोर्टबॅक सादरीकरणाला देशभरात मोठी मागणी आहे. ऑडी ए4, ए6, ए8एल, क्यू3, स्पोर्टबॅक, क्यू5, क्यू7, क्यू8, एस5 स्पोर्टबॅक, आरएस5 स्पोर्टबॅक, आरएस क्यू8, इ टोर्न50, ई टोर्न 55, ई टोर्न स्पोर्टबॅक 55 आणि ई टोर्न भारतीय बाजारपेठेत जीटी आणि आरएस ई ट्रॉन जीटी मॉडेलची विक्री करण्यात येते.