For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाजारात आकर्षक दहीहंडीचे माठ

06:15 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाजारात आकर्षक दहीहंडीचे माठ
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

गोकुळाष्टमी तीन दिवसांवर आल्याने बाजारात दहीहंडीसाठी माठ (मटकी) दाखल झाले आहेत. विविध आकारातील आकर्षक मटकी ठेवण्यात आली आहेत. गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे माठांना मागणी अधिक असते. या पार्श्वभूमीवर बाजारात आकर्षक मटकी दाखल झाली आहेत.

साधारण शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत आकर्षक मटकी उपलब्ध आहेत. आकारमानानुसार किमती कमी-जास्त आहेत. शहरासह ग्रामीण भागातही दहीहंडीचा कार्यक्रम केला जातो. त्यामुळे विविध मंडळे आणि तरुणांकडून ही मटकी खरेदी केली जात आहेत. त्याबरोबर श्ऱीकृष्ण मूर्तीही दाखल झाल्या आहेत. 60 ते 600 रुपयांपर्यंत या मूर्तींच्या आकारमानानुसार किमती आहेत. विशेषत: दहीहंडींना रंगीबेरंगी सजावट करून विक्री केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.