खड्डेमय रस्ता ; दीपक पाटकर यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष
मालवण | प्रतिनिधी
मालवण शहरातील पिंपळपार ते भरड नाका हा मुख्य रस्ता खड्डेमय बनला आहे. दहा वर्षात काहीच काम झाले नाही त्यापैकीच ह्या अश्या समस्यांनी जनता त्रस्त आहे. मात्र आमदार निलेश राणे यांच्या रूपाने हक्काचे आणि कार्यतत्पर आमदार जनतेला लाभले आहेत. त्यामुळे मालवण शहरातील हे मुख्य रस्तेही मार्गी लागणार आहेत.
या रस्त्या प्रश्नी बांधकाम विभाग व नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी. रस्ता डांबरीकरण करावा. प्रशासनाने लक्षात घ्यावे आता येथील आमदार निलेश राणे आहेत जे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देतात. येथील खासदार राणे आहेत. हे लक्षात घेता प्रशासनाने गती पकडावी. आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर आहोत. असे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सांगितले.