सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न- सोनिया गांधी
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा आरोप : लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सत्तेवर असलेल्या लोकांसाठी धर्मनिरपेक्षता राज्य ठरली आहे. याचमुळे आमच्या समाजातील ध्रूवीकरण वाढत चालले आहे. धर्मनिरपेक्षता भारताच्या लोकशाहीच्या पायातील दगड असल्याचा दावा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी एका लेखाद्वारे केला आहे.
सत्तेवर बसलेले लोक आपण लोकशाहीसाठी प्रतिबद्ध असल्याचे सांगतात, परंतु प्रत्यक्षात ते याला कमकुवत करत आहेत. आमच्या देशाला एकतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या मार्गांना नष्ट केले जात आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता अत्यंत दृढपणे परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत असे सोनिया गांधींनी म्हटले आहे.
धर्मनिरपेक्षतेचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात, परंतु भारताच्या संदर्भात सर्वात उपयुक्त अर्थ महात्मा गांधी यांच्या कथनातून जाहीर होतो. महात्मा गांधी यांनी सर्व धर्मांदरम्यान एकता अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले होते. भारत अनेक धर्मांनी मिळून तयार झालेला एक समाज असल्याची जाणीव जवाहरलाल नेहरू यांना होती. याचमुळे त्यांनी सातत्याने धर्मनिरपेक्ष देश निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात भारताच्या संविधान निर्मात्यांनी धर्मनिरपेक्षतेची ही कल्पना विकसित केली आणि सरकारने ती लागू केली. याचमुळे एका अनोख्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीची स्थापना झाल्याचे सोनिया गांधी यांनी लेखात नमूद पेले आहे.