For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : सोलापुरात ज्वेलर्स दुकानात बनावट पिस्तूल दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न

05:46 PM Nov 03, 2025 IST | NEETA POTDAR
solapur   सोलापुरात ज्वेलर्स दुकानात बनावट पिस्तूल दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न
Advertisement

     आरटीओ रोडवरील समर्थ ज्वेलर्समध्ये तिघांचा दरोड्याचा प्रयत्न

Advertisement

सोलापूर : बनावट पिस्टल व कोयत्याचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी ज्वेलर्स दुकानातील दागिने जबरदस्तीने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. ही घटना शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास आरटीओ कार्यालय रोड, गणेश नगर बस स्टॉपजवळ असलेल्या समर्थ ज्वेलर्स दुकान येथे घडली.

याप्रकरणी दीपक दिगंबर वेदपाठक (वय ६३, रा. साई श्रद्धा अपार्टमेंट, चौडेश्वरी मंदिर, बिजापूर रोड) यांनी अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शनिवारी रात्री पावणेआठच्या दरम्यान फिर्यादी वेदपाठक हे त्यांच्या समर्थ ज्वेलर्स या दुकानात असताना तीन अज्ञात व्यक्ती हे निळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आले.

Advertisement

यावेळी एकाच्या हातात बनावट पिस्टल व दुसऱ्याच्या हातात कोयता होता. त्यांनी या बनावट पिस्टल व कोयत्याचा धाक दाखवून वेदपाठक यांना सोन्याचे दागिने काढून दे, असे म्हणून दमदाटी केली. दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या हातातील कोयता फिर्यादींच्या जवळ आणून तुझ्या दुकानातील दागिने दे, असे म्हणाला.

यावेळी फिर्यादींनी दुकानातील दागिने काढून न दिल्याने त्याने कोयता जोरात फिर्यादींच्या दुकानातील काउंटरवर असलेल्या काचेवर मारून काच फोडली. यावेळी जबरदस्तीने दागिने चोरून नेण्याचा प्रयत्न केला, तर दुकानातील काच फोडून चोरट्यांनी दहा हजारांचे नुकसान केले. यानंतर फिर्यादींनी आरडाओरड केली. त्यामुळे घाबरून चोरट्यांनी पलायन केले. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.