हुबळीत बँकेवर दरोड्याचा प्रयत्न
06:20 AM Jan 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ बेंगळूर
Advertisement
बिदरमध्ये दोघांचा गोळीबार करून एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली रक्कम दरोडेखोरांनी लुटली होती. त्यापाठोपाठ दोनच दिवसात मंगळूरच्या उळ्ळाल येथे सहकारी बँकेवर दरोडा टाकण्यात आला होता. आता हुबळीत बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. हुबळीच्या एपीएमसीजवळील कॅनरा बँक शाखेत रविवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी लूट करण्याचा प्रयत्न केला. बँकेचे शेल्टर वाकवून आत शिरण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न विफल ठरला. त्यामुळे त्यांनी तेथून काढता पाय घेतला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. बँक कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याविषयी माहिती दिली. नवनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Advertisement
Advertisement