For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीचा प्रयत्न

02:12 PM Oct 15, 2025 IST | NEETA POTDAR
sangli    अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीचा प्रयत्न
Advertisement

                   शाळेत जाताना वाटेत थांबवून विनयभंगाचा प्रयत्न

Advertisement

जत : जत पूर्व भागात अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने संशयित प्रताप महिंद्रा सावंत (रा. सालेकीरी, ता. जत) पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद संबंधित पीडित अल्पवयीन मुलीने जत पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जतपूर्व भागातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शाळेसाठी जात होती. अल्पवयीन मुलगी घरातून शाळेकडे जात असताना रस्त्यातील एका ठिकाणी तिच्या पाठीमागून प्रताप सावंत हा मोटारसायकलवरून आला. त्याने मुलीचा हात धरून "तू मला खूप आवडतेस" असे म्हणून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.

Advertisement

या प्रकरणी जत पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. प्रताप सावंत फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Advertisement
Tags :

.