Kavthehankal Crime : पूर्व वैमनस्यातून खून करण्याचा प्रयत्न, फिर्यादी गंभीर जखमी
कवठेमहांकाळ पोलिसांची तत्पर कारवाई
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे मंगळवारी एकावर पूर्व वैमनस्यातून एकावर खूनी हल्ल्याचा प्रयत्न झाला. कवठेमहांकाळ शहरातील उपकोषागार कार्यालयासमोर झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी मोहसीन दस्तगीर जमादार (वय ३७, रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आठ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ नोव्हेंबर रोजी रात्री फिर्यादीचा भाऊ मन्सुर, त्याची पत्नी साईशा, फिर्यादीची पत्नी करिष्मा, तसेच राहुल कांबळे व त्याची पत्नी अनिशा असे अतुल कांबळे यांनी सलगरे येथे फिर्यादीचे भावास केलेल्या मारहाणीची तक्रार देण्याकरिता आले असता सदरची फॉर्च्यूनर कार उप कोषागार कार्यालयासमोर पार्क करून फिर्यादीचा भाऊ त्याची पत्नी, राहुल कांबळे व त्याची पत्नी हे तक्रार देण्याकरता गेले.
फिर्यादी त्यांचे फॉर्च्यूनर कार बाहेर थांबले असताना, फिर्यादीच्या ओळखीचा अतुल जगन्नाथ कांबळे रा. कोंगनोळी याचे सांगणे बरून संशयित आरोपी रवी खत्री, प्रदीप मोरे, लोकेश नाईक, महादेव भंडारी, सोमनाथ डवरी, साहिल डफेदार, सत्तार महात, अतुल कांबळे यांनी फिर्यादीचे भावास अतुल कांबळे यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास सांगितल्यावरून रवी खत्री व त्याचे सोबत असलेल्या व साथीदारानी फिर्यादीस मारहाण करून लोकेश नाईक महादेव भंडारे, सोमनाथ डबरी यांनी फिर्यादीचे हात पकडून ठेवले.
त्यावेळी रवी खत्री व प्रदीप मोरे यांनी त्यांच्या कमरेस असलेले चाकू बाहेर काढून आता जीवंत ठेवायचे नाही असे म्हणून रबी खत्री याने फिर्यादीच्या पोटात व प्रदीप मोरे यांनी डावी बाजूस काखेजवळ बरगडीत चाकूने भोकसुन फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.