For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न; परप्पन कारागृहातील वॉर्डनला अटक

11:39 AM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न  परप्पन कारागृहातील वॉर्डनला अटक
Advertisement

बेंगळूर : कैद्यांना सिगारेट आणि बंदी घातलेल्या ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृहाच्या जेल वॉर्डनला अटक करण्यात आली आहे. राहुल पाटील असे अटक केलेल्या जेल वॉर्डनचे नाव आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये त्याची बेळगावच्या हिंडलगा कारागृहातून बेंगळुरातील परप्पन अग्रहार कारागृहात बदली करण्यात आल्याचे समजते. शुक्रवारी संध्याकाळी केएसईएसएफचे कर्मचारी परप्पन अग्रहार कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तपासणी करत असताना जेल वॉर्डन राहुल पाटील ड्युटीवर आला. दरम्यान, त्याची तपासणी केली असता त्याच्या अंडरवेअरमध्ये दोन सिगारेटचे पॅकेट असल्याचे आढळून आले. ही बाब कारागृह अधीक्षक परमेश यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. सदर प्रकरण गांभीर्याने घेत परप्पन अग्रहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.