For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj : मिरजेत कलगुटगी खून प्रकरणातील आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न; पाच हल्लेखोरांना अटक

05:01 PM Nov 13, 2025 IST | NEETA POTDAR
miraj   मिरजेत कलगुटगी खून प्रकरणातील आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न  पाच हल्लेखोरांना अटक
Advertisement

                           मिरज पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला हल्ला

Advertisement

सांगली : मिरजेतील निखिल कलगुटगी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी यांच्यावर मिरज सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. पीएसआय दत्तात्रय पुजारी आणि गवळी यांनी त्वरित कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रिवॉल्वर आणि कोयता जप्त करण्यात आला.

हल्ल्याच्या प्रयत्नानंतर अन्य चार हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेमुळे मिरजेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पथकाने केवळ चार तासांत पाचही आरोपींना अटक केली. अटक केलेले आरोपी म्हणजे वंश दिनकर वाली, समर्थ संजय गायकवाड, आकाश फोंडे, वैभव आवळे आणि सौरभ पोतदार अशी नावे आहेत.

Advertisement

सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असताना संशयितांनी हल्ल्याची योजना आखली होती. एकाने प्रथम हल्ला करून नंतर इतरांनी सहभागी व्हायचे, असा त्यांचा डाव होता; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे हल्ला विफल ठरला. घटनेनंतर परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.