For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालकमंत्र्यांकडून बोगस मतदानाचा प्रयत्नः समरजीतसिंह घाटगेंच्याकडून आक्षेप

01:09 PM Nov 20, 2024 IST | Radhika Patil
पालकमंत्र्यांकडून बोगस मतदानाचा प्रयत्नः समरजीतसिंह घाटगेंच्याकडून आक्षेप
Attempt to conduct bogus voting by the Guardian Minister: Objection from Samarjit Singh Ghatge
Advertisement

कोल्हापूर : 
कागल शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील बुथ क्रमांक ३६ व ३७ तसेच पिराचिवाडी तालुका कागल या ठिकाणी बोगस मतदान करण्याचा पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही प्रयत्न सुरू होता. या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्या मतदान प्रतिनिधी असलेल्या सिकंदर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी हाणून पाडला असल्याची माहिती समरजीतसिंह घाटगे यांनी दिली.

Advertisement

उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली व प्रशासनाला बोगस मतदानाचा प्रकार खपवून घेणार नाही,असा इशारा दिला. अशा बोगस मतदान करण्याच्या प्रक्रियेचा घाटगे यांनी तीव्र शब्दात निषेधही केला.

समरजीतसिंह घाटगे यांनी बोगस मतदानाच्या बाबतीत या आधीच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचेही आवाहन केले होते. पालकमंत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दमदाटीही केल्याचे घाटगे यांनी म्हटले आहे. बोगस मतदान करून असंविधानिक पद्धतीने सत्ता मिळवण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे.त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते असे प्रयत्न करीत आहेत परंतु कोणत्याही परिस्थितीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. असे समरजीतसिंह घाटगे यांनी म्हटले आहे. तसेच कागल शहरात हा बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आणून हाणून पाडल्याबद्दल सिकंदर या कार्यकर्त्याचे घाटगे यांनी अभिनंदन ही केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.