कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मगो’ ला कात्रित पकडण्याचा प्रयत्न

06:22 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पूजा नाईकही गुन्हेगार;  विजय सरदेसाई यांनी फोडले पोलिसांवर खापर

Advertisement

मंत्री ढवळीकर  यांना रोखण्याचा  अप्रत्यक्ष प्रयत्न होत असल्याचा आरोप

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

जिल्हा पंचायतीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. अशा काळातच सरकारातील एका मंत्र्यावर म्हणजे सुदिन ढवळीकर यांच्यावर नोकऱ्याविक्रीचा आरोप होणारा आरोप हा राजकीय दबाव तंत्रा चा भाग आहे. कारण सुदिन ढवळीकर हे मगोचे प्रमुख नेते आहेत. ते जिल्हा पंचायत निवडणुकीत सरशी करू नयेत, यासाठीच राजकीय हेतूने प्रेरीत हे आरोप होत असल्याचा दावा गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. सामाजिक माध्यमावरून (वृत्तवाहिनी) बोलताना आमदार सरदेसाई म्हणाले की, पूजा नाईक ही स्वत: गुन्हेगार आहे. तिने ऐन जिल्हा पंचायत निवडणुकीत सुदिन ढवळीकर यांच्यावर नोकऱ्यांसाठी पैसे घेतल्याचा केलेला आरोप हा तथ्यहीन दिसतो. कारण सध्या निवडणुकीचे वारे आहे. सुदिन ढवळीकर हे मगो पक्षाचे असल्याने त्यांना कात्रित पकडण्यासाठीच हे केलेले षयंत्र असू शकते, असेही ते म्हणाले.

पूजा नाईक ही जर 613 नोकऱ्यांसाठी करोडो ऊपये दिल्याचे सांगत असेल तर सरकारातील सर्व मंत्र्यांची चौकशी व्हायला हवी. केवळ सुदिन ढवळीकर यांचेच नाव पुढे का केले जात आहे, हेही तपासायला हवे. पूजा नाईक हिने जर करोडो ऊपये नोकऱ्यांसाठी मंत्र्याला दिले असतील तर सरकारने इतर मंत्र्यांची नावे जाहीर करावीत. कारण भाजप सरकार नोकऱ्या विकते, हे पूजा नाईक हिच्या आरोपावरून सिद्ध होते. अशामुळे गोमंतकीय युवकांचा घात होत आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत सुदिन ढवळीकर यांना वावरता येऊ नये, यासाठी त्यांना ट्रॅप करण्यासाठी आणि मगो पक्षाला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचेही आमदार सरदेसाई म्हणाले.

नोकऱ्यांसाठी पैसे घेतल्याचा आरोप पूजा नाईक करीत असले तरी ती स्वत: एक गुन्हेगार आहे. कारण नोकऱ्यांसाठी पैसे घेणारे आणि देणारेही गुन्हेगार आहेत. त्यादृष्टीने तपास केला जात नाही. पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे. राहुल गुप्ता हे जरी तपास करीत असले हा तपास चुकीच्या दिशेने चालला आहे. पोलिसांची तपास हा संशयास्पद असल्याचा आरोपही आमदार सरदेसाई यांनी केला.

पूजा नाईकचे आरोप खोटे : सुभाष फळदेसाई

पूजा नाईक ही माध्यमांकडे मंत्र्यांनी नोकऱ्यांसाठी पैसे घेतल्याचे सांगत असले तरी तिचे आरोप खोटे आहेत, असा दावा भाजप सरकारातील समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला आहे. सामाजिक माध्यमाद्वारे (वृत्तवाहिनी) बोलताना फळदेसाई म्हणाले की, पूजा नाईक हिने सांगितल्यानुसार 613 लोकांना जर करोडो ऊपये दिले असतील तर नोकऱ्या मिळाल्या नाहीत म्हणून पूजा नाईक हिच्याकडे किमान दिवसाला 300 लोकांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावायला हवा. परंतु तसे होताना दिसत नाही. मंत्री कोणीही असू द्या, त्याची प्रतिमा मलिन करण्याचा हा पूजा नाईकचा प्रयत्न आहे. असे होता कामा नये. जिल्हा पंचायती निवडणूक काळातच हा आरोप झालेला आहे. यापुढेही निवडणूक काळात आरोप होऊ शकतात. परंतु त्यात तथ्य नसल्याचेही फळदेसाई म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article