महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवादावर प्रहार, द्विपक्षीय सहकार्यावर भर

06:58 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निर्दोष लोकांची हत्या असहनीय : आँस्ट्रियासोबतच्या चर्चेत पंतप्रधान मोदींचे भाष्य,

Advertisement

वृत्तसंस्था/ व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी ऑस्ट्रियाचे अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेतली. त्यानंतर ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशी संयुक्त चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी दहशतवादावर प्रहार करताना तीव्र शब्दात निषेध केला. तसेच विविध क्षेत्रात द्विपक्षीय परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर दिला.

रशियाचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी एका युरोपीय देशाच्या दौऱ्यावर ऑस्ट्रियाला पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांची भेट घेतली. यादरम्यान, पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांनी जागतिक संघर्ष (विशेषत: युव्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध) सोडवण्यासाठी ‘संवाद आणि मुत्सद्देगिरी’च्या महत्त्वावर भर दिला.   तसेच दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. याप्रसंगी भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून त्याचा आवाज जगभर ऐकला जातो. भारताचा विश्वासार्ह भागीदार असण्यासोबतच ऑस्ट्रियाला युव्रेनच्या संकटावर शांततापूर्ण तोडगाही हवा आहे. दहशतवादाचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे ऑस्ट्रियाचे चान्सलर म्हणाले.

संयुक्त चर्चेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्यांना स्पर्श केला. भारत आणि ऑस्ट्रिया दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. दहशतवादाला कोणत्याही स्वरूपात स्वीकारले जाणार नाही. तसेच त्याचे समर्थनही करता येणार नाही. युव्रेनमधील संघर्ष असो किंवा पश्चिम आशियातील परिस्थिती असो, जगात सुरू असलेल्या संघर्षांबद्दल चान्सलर नेहमर आणि मी विस्तृतपणे बोललो. ही युद्धाची वेळ नाही, असे मी यापूर्वीही म्हटले आहे. युद्धभूमीवर समस्या सोडवता येत नाहीत. निष्पाप लोकांचा मृत्यू कुठेही झाला तरी तो आम्हाला मान्य नाही. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित करण्यासाठी आम्ही संवाद आणि मुत्सद्देगिरीचा आग्रह धरतो. यासाठी आम्ही दोघे मिळून आंतरराष्ट्रीय व्यासपीठाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केला.

परस्पर सहकार्यावर भर

भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील संबंधांना अधिकाधिक गतीने वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही देश सक्रियपणे काम करण्यास सज्ज आहेत. येत्या दशकासाठी सहकार्याची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. हे केवळ आर्थिक सहकार्य आणि गुंतवणुकीपुरते मर्यादित नाही. पायाभूत सुविधांचा विकास, नवोपक्रम, नवीकरणीय ऊर्जा, हायड्रोजन, पाणी आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये एकमेकांची ताकद जोडण्यासाठी काम केले जाईल. दोन्ही देशांतील युवा शक्ती आणि कल्पना यांना जोडण्यासाठी स्टार्टअप्सना चालना दिली जाईल. परस्पर विकास आणि स्थलांतर यावरील भागीदारीवर एक करार आधीच झाला आहे. कायदेशीर स्थलांतर आणि कुशल कामगारांना सहाय्य केले जाईल. हवामान बदल आणि दहशतवाद यांसारख्या आज मानवतेला भेडसावणाऱ्या आव्हानांवरही आम्ही विचार मांडले. आम्ही ऑस्ट्रियाला आंतरराष्ट्रीय सौर भागीदारी आणि जैवइंधन भागीदारी यासारख्या हवामान उपक्रमांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करतो, असे प्रतिपादनही पंतप्रधान मोदी यांनी केले.

ऐतिहासिक दौरा

रशियानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रियाला ऐतिहासिक भेट दिली. तिसऱ्या कार्यकाळाच्या सुऊवातीला पंतप्रधान मोदींना ऑस्ट्रियाला भेट देण्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रिया दौरा केवळ ऐतिहासिकच नाही तर खूप खास ठरला. 41 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रियाला पोहोचले. या दौऱ्याबाबत समाधान व्यक्त करताना मोदींनी स्वत:ला भाग्यवान असे संबोधले आहे. ऑस्ट्रियाने पंतप्रधान मोदींचे मनापासून स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. तसेच मला माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुऊवातीला ऑस्ट्रियाला भेट देण्याची संधी मिळाली याचा मला आनंद असल्याचेही नमूद केले.

‘वंदे मातरम्’च्या गजरात स्वागत

रशियाचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ऑस्ट्रियाला पोहोचले आहेत. ऑस्ट्रियामध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात येत आहे. व्हिएन्नाच्या हॉटेल रिट्झ-कार्लटन येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर ऑस्ट्रियन कलाकारांनी वंदे मातरम्ची धुन वाजवून त्यांचे स्वागत केले. ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहमर यांनी त्यांचे आलिंगन देत स्वागत केले. खासगी कार्यक्रमादरम्यान नेहमर हे भारतीय पंतप्रधानांना आलिंगन देताना आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेताना दिसून आले. मोदींनी व्हिजिटर बुकवर स्वाक्षरी केली. याप्रसंगी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर त्यांच्यासोबत होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article