For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाझामध्ये शरणार्थी शिबिरावर हल्ला, 32 ठार

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
गाझामध्ये शरणार्थी शिबिरावर हल्ला  32 ठार
Advertisement

इस्रायलकडून एअरस्ट्राइक : मृतांमध्ये महिला-मुलांचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था /राफाह

हमासविरोधी युद्धादरम्यान इस्रायलने मध्य गाझामध्ये 76 वर्षे जुन्या नुसीरत शरणार्थी शिबिरावर हवाई हल्ला केला आहे. यादरम्यान एका शाळेला लक्ष्य करण्यात आले. लढाऊ विमानांच्या मदतीने करण्यात आलेल्या या हल्ल्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. इस्रायलच्या सुरक्षा दलाने या हल्ल्याची पुष्टी दिली आहे. संबंधित शाळेत हमासच्या नुखबा फोर्सच्या दहशतवाद्यांनी आश्रय घेतला होता, हवाई हल्ल्याद्वारे त्यांनाच लक्ष्य करण्यात आल्याचे आयडीएफने म्हटले आहे. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून 10 लाखाहून अधिक लोक बेघर झाले आहेत. या लोकांनी गाझामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाळा आणि रुग्णालयांमध्ये आश्रय घेतला आहे. नुसीरत शरणार्थी शिबिर गाझापट्टीच्या मधोमध आहे. 1948 मध्ये इस्रायलच्या निर्मितीनंतर लाखो पॅलेस्टिनी बेघर झाले होते, त्यांना आश्रय देण्यासाठी नुसीरत शरणार्थी शिबिर स्थापन करण्यात आले हेते. शाळेवर हल्ला करण्यापूर्वी पूर्ण तयारी करण्यात आली होती. सामान्य नागरिकांना नुकसान होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. याकरता परिसराची हवाई टेहळणी करण्यात आली होती. तसेच तेथे असलेल्या गुप्तचरांद्वारे माहिती जमविण्यात आली होती असे इस्रायलकडून सांगण्यात आले. तर इस्रायलच्या हल्ल्यानंतर गाझामधील हमासच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने शाळेवरील हल्ल्याला नरसंहार ठरविले आहे.

Advertisement

राफावर लक्ष केंद्रीत

7 महिन्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत सुमारे 36 हजार 586 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. गाझामधील राफा या शहरावर इस्रायलने आता लक्ष केंद्रीत केले आहे. आतापर्यंत हमासच्या 24 बटालियन संपविण्यास यश आले आहे. परंतु अद्याप 4 बटालियन राफामध्ये लपून आहेत. त्यांच्या खात्म्यासाठी राफामध्ये मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे इस्रायलचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.