For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाल समुद्रात पाकिस्तानच्या जहाजावर हल्ला

06:46 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
लाल समुद्रात पाकिस्तानच्या जहाजावर हल्ला
Advertisement

हुती बंडखोरांनी स्वीकारली जबाबदारी : अमेरिकेकडून जोरदार कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ सना

लाल समुद्रात पाकिस्तानच्या कराचीच्या दिशेने प्रवास करत असलेल्या जहाजावर बुधवारी हल्ला झाला आहे. हे जहाज 26 डिसेंबर रोजी सौदी अरेबियातून रवाना झाले होते. हुती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यामुळे जहाजाचे किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Advertisement

याचदरम्यान अमेरिकेने लाल समुद्रात हुती बंडखोरांकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्स नष्ट केली आहेत. 10 तासांमध्ये हुतींचे 12 ड्रोन्स, 2 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs आणि 2 अन्य क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यात आले आहे. परंतु यादरम्यान कुठल्याही जहाजाला नुकसान पोहोचले नसल्याची माहिती पेंटागॉनच्या सेंट्रल कमांडकडून देण्यात आली.

मागील 4 आठवड्यांमध्ये हुती बंडखोरांनी लाल समुद्र आणि त्याच्या आसपास 100 हून अधिक हल्ले केले आहेत. सुमारे महिन्याभरापूर्वी हुती बंडखोरांनी लाल समुद्रात कार्गो शिप गॅलेक्सी लिडरचे अपहरण केले होते. हे जहाज तुर्किये येथून भारताच्या दिशेने प्रवास करत होते. हुती बंडखोरांनी याला इस्रायली जहाज समजून ते ताब्यात घेतले होते. हुती बंडखोरांना इराणकडून पाठबळ मिळत असल्याचे मानले जाते. येमेनमधील मोठ्या भूभागावर हुती बंडखोरांनी नियंत्रण मिळविले आहे.

Advertisement
Tags :

.