For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला, मंदिराच्या भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा

01:04 PM Dec 23, 2023 IST | Kalyani Amanagi
अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला  मंदिराच्या भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा
Advertisement

खलिस्तानवाद्यांनी अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला केला आहे. अमेरिकेतील नेवार्क, कॅलिफोर्निया येथील हिंदू मंदिरावर हा हल्ला करण्यात आला असून मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक घोषणा लिहिण्यात आल्या आहेत या संबंधी काही छायाचित्रे हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने ट्विटरवर शेअर केली आहेत.

Advertisement

हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने ट्विटरवर म्हटले आहे की, 'येथे हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी नेता भिंद्रनवालेचा उल्लेख आहे. हे कृत्य भारताविरोधी कृत्य असून हिंदू नागरिकांना भीती दाखवण्याच्या उद्देशाने हे करण्यात आले आहे. या संदर्भात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'कॅलिफोर्नियातील नेवार्क येथील स्वामीनारायण मंदिर वासना संस्थेच्या भिंतींवर खलिस्तान समर्थक घोषणा रंगवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी नेवार्क पोलिस योग्य ती कारवाई करतील तसेच या प्रकरणाचा संपूर्ण तपास करतील. या द्वेषपूर्ण गुन्हाच्या तपास झाला पाहिजे. या घटनेबाबत स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.