महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू-काश्मीरात परप्रांतीयावर हल्ला

07:00 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयावर दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात शुभम कुमार हा उत्तर प्रदेशातील बिजनोर येथील कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. कुमार याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार होत आहेत. ही घटना गुरुवारी बाटागुंड खेड्यात घडली. एका आठवड्यात प्ररप्रांतीय मजुरावारील हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. गेल्या रविवारी गांदरबाल येथे सहा परप्रांतीय कामगारांची आणि एका डॉक्टरची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. तर 18 ऑक्टोबर या दिवशी एका बिहारी कामगाराची हत्या करण्यात आली होती. गांदरबाल येथे रविवारी जो हल्ला झाला, त्यात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. या फूटेजच्या माध्यमातून या केंद्रशासित प्रदेशातील पोलिस दहशतवाद्यांचा मागोवा घेत आहेत.

Advertisement

सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि मित्रपक्षांच्या सरकारने प्रदेशातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे काम सुरु केल्याची माहिती देण्यात आली. नवे सरकार स्थापन झाल्यापासून परप्रांतीयांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. प्रदेशाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी परप्रांतीयांवरील हल्ल्याचा निषेध केला असून पोलिस यंत्रणेला सजग बनविण्यासाठी पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले.

प्रदेश सरकारला केंद्राचे साहाय्य

प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आवश्यक असल्यास साहाय्य करण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शविली आहे. प्रदेशाचा आर्थिक विकास आणि सुरक्षा यांच्या संदर्भात केंद्र सरकार प्रदेश सरकारशी सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, पुढाकार प्रदेश सरकारने घ्यावयास हवा, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

त्वरित राज्याचा दर्जा द्या

जम्मू-काश्मीरला त्वरित पुन्हा राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी भारताचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे. आता प्रदेशात नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे तेथे केंद्र सरकारचा प्रभाव असण्याचे कारण नाही. जम्मू-काश्मीर हे पूर्वी राज्यच होते. आता ते स्थान त्याला पुन्हा देण्यात आले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी गुरुवारी केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article