महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बीआरएस आमदारावर तेलंगणात हल्ला

06:03 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निवडणूक प्रचारादरम्यान गंभीर जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

तेलंगणामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान बीआरएस आमदारावर हल्ला झाल्याची घटना उघड झाली आहे. या हल्ल्यात बीआरएस आमदार गुवाला बालाराजू गंभीर जखमी झाले आहेत. काँग्रेस आणि बीआरएस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षादरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

बालाराजू हे अच्छामपेट विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते पुन्हा एकदा या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. बालाराजू शनिवारी रात्री आपल्या कार्यक्षेत्रात प्रचार करत होते. याचदरम्यान, काँग्रेसचे उमेदवार वामसी कृष्णा यांनी बालाराजू यांच्या वाहनात मोठी रक्कम असून ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप केला. यावेळी दोन्ही पक्षाच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. बालाराजू यांनी आपल्या वाहनाची तपासणी करण्यास नकार दिला. मात्र, काँग्रेस समर्थक आमदारांच्या गाडीची तपासणी करण्यावर ठाम होते. यानंतर बीआरएस समर्थक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आणि अखेर दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत बीआरएस आमदाराच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली असून या दगडफेकीत बीआरएस आमदार जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना हैदराबाद येथील अपोलो ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेलंगणा सरकारचे मंत्री आणि बीआरएस नेते के. टी. रामाराव यांनी अपोलो ऊग्णालयात धाव घेत जखमी आमदार गुवाला बालाराजू यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article