Sangli Crime: सांगलीत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
घटनास्थळी रक्त सांडल्याचे फोटो व्हायरल झाले होते
सांगली: येथील मंगळवार बाजार परिसरात एका कॉम्प्लेक्ससमोर रविवारी सकाळी दोघांमध्ये झालेल्या चादातून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. मांडीवर वार झाल्याने घटनास्थळी रक्त सांडले होते. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले होते.
परंतु संजयनगर पोतिस ठाण्यात याबाबत रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती. या हल्ल्याबाबत पोलिसांनादेखीत काही माहिती नव्हती. शहरातील मंगळवार बाजार परिसरातीत खोक्यांचे पुनर्वसन करून तेथे कॉम्प्लेक्स उभारुण्यात आले आहे. येथील काही गाळे हे कुलूपबंद आहेत.
तेथे नशेोरांचा अड्डा बनला आहे. रविवारी सकाळी दोघा तरुणांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर एकाने धारपार हत्याराने दुस-याच्या मांडीवर वार केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी जखमी तरुणास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यानंतर घटनास्थळी रक्त सांडल्याचे फोटो व्हायरल झाले होते.
मात्र, खासगी हॉस्पिटलमधून संजयनगर पोलिस ठाण्यास कोणतीही माहिती कळविली नव्हती. तसेच संजयनगर पोलिसही हॉस्पिटतमध्ये गेले नव्हते. त्यामुळे भरदिक्सा हल्ला होऊनही पोलिस ठाण्यात कोणतीच नोंद नव्हती.