दिल्लीत ‘एटीएस’कडून दोघांना शस्त्रांसह अटक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीतील द्वारका जिह्यातील एटीएस पोलीस पथकाने दोन गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. इशू लाक्रा (22) आणि सागर तेहलान (23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही दिल्लीतील नजफगढ भागातील रहिवासी असल्याची माहिती द्वारका जिल्हा पोलीस विभागाचे डीसीपी अंकित सिंग यांनी दिली. एसीपी रामावतार यांच्या देखरेखीखाली आणि एटीएसचे प्रभारी निरीक्षक कमलेश यांच्या नेतृत्वाखाली एसआय धनंजय, टोपेश आणि इतरांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांकडे अवैध शस्त्रs असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी एटीएसअडून सापळा रचण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या चौकशी सुरू असून त्यांच्या घरातून एक अत्याधुनिक पिस्तूलही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.