कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आठल्ये गुरुजी रोड मंडळाचा यंदा अमृतमहोत्सव

12:14 PM Sep 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शामाप्रसाद मुखर्जी रोड, आठल्ये गुरुजी रोड, संत सेना रोड येथील मंडळ : विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन 

Advertisement

बेळगाव : समाजाने एकत्र यावे, या उद्देशाने डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रोड, आठल्ये गुरुजी रोड, शास्त्राrनगर व संत सेना रोड येथील कार्यकर्त्यांनी 1950 मध्ये गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. या मंडळाचा यावर्षी अमृतमहोत्सव असून त्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाने सुरुवातीपासून सामाजिक उपक्रमांवर भर दिला असून यावर्षीही अनेक उपक्रम राबविले जात आहेत. 1950 च्या काळात या परिसरात मोजकीच घरे होती. बेळगाव शहर व शहापूरला जोडणाऱ्या रस्त्यावर हा परिसर होता. आजूबाजूला दाट झाडी आणि मोठमोठे खड्डे पडून वर्षभर पाणी साचून राहायचे. तुरळक लोकवस्ती असल्यामुळे सहसा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हते. त्यामुळे परिसरात एकी निर्माण व्हावी, यासाठी अथणीमठ यांच्या निवासस्थानी पहिल्या वर्षीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दोन वर्षे या ठिकाणी प्रतिष्ठापना केल्यानंतर आठल्ये गुरुजी रोड येथे गणेशोत्सव सुरू करण्यास प्रारंभ झाला.

Advertisement

डीजेला फाटा देण्याचा प्रयत्न

गणेशोत्सव मंडळाने सुरुवातीपासूनच पारंपरिक वाद्यांवर भर दिला आहे. सध्याच्या कार्यकारिणीनेही हाच उपक्रम पुढे सुरू ठेवला आहे. डीजेला फाटा देत मंडळाकडून ढोलताशा व झांजपथक या वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली जाते. विसर्जन तलाव अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने आठल्ये गुरुजी रोड, शामाप्रसाद मुखर्जी रोड, शास्त्राrनगर, संत सेना रोड या परिसरात गणेशमूर्तीची मिरवणूक काढली जाते. सध्या या मंडळाची धुरा अध्यक्ष सुनील राव, उपाध्यक्ष शेखर वाईंगडे, कार्याध्यक्ष रवी नाईक, उपकार्याध्यक्ष चेतन चौगुले, सेक्रेटरी विकास पाटील, उपसेक्रेटरी गुरू पाटील, खजिनदार एन. एस. सर्वण्णावर, उपखजिनदार गुरुदत्त वाईंगडे यांच्याकडे आहे. मंडळाला सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर व आर्किटेक्ट कुलदीप मोरे यांचे सहकार्य मिळत असते.

डोळे दिपवणारा आगमन सोहळा

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने गणेशोत्सव मंडळाने यावर्षी भव्यदिव्य व डोळे दिपवणारा आगमन सोहळा साजरा केला. धर्मवीर संभाजी चौकापासून एसपीएम रोडपर्यंत ढोलताशांच्या गजरात व लाईट इफेक्टमध्ये आगमन सोहळा करण्यात आला. यावर्षी सर्वात भव्यतेने मंडळाने आगमन सोहळा करून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले. याचबरोबर रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, नेत्रतपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यासाठी पुढील काही दिवसात उपक्रम राबविले जाणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article