अॅथलेटिक्स निवड चाचणी उत्साहात
बेळगाव : बेळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने 14 वर्षांखालील मुलां मुलींसाठी जिल्हा अॅथलेटिक्स संघ निवड चाचणी व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ही निवड चाचणी जिल्हा स्टेडियम, नेहरू नगर, बेळगाव या ठिकाणी उत्साहात झाली.
या स्पर्धेत जिल्हायातून सुमारे 100 स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. त्यामध्ये 10 खेळाडूंची निवड करण्यात आली. निवडलेले खेळाडू पुढील प्रमाणे. समक्ष कुंभार 100 व 200 मी., सक्षम कुंभार 100 व 200 मी., 4×100 मी. रिले, विराज कुगजी 400, 4×100 मी. रिल, अनोज हनगोजी 400, 600 मी., 4×100 मी रिले, प्रार्थ कंणबरकर थाळीफेक, जोत्स्ना हंजिरकर 100, 200 मी., 4×100 रिले, माधुरी पाटील 200, 400 मी., 4×100 रिले, स्नेहल नाईक 600 मी., 4× 100, समीक्षा कर्तसरकर 200, 400 मी., 4×100 मी. रिले, सेजल धामणेकर लांबउडी उंचउडी, 4×100 रिले व राखिवसाठी ऋतुजा जाधवची निवड केली आहे.
6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान श्री कंठीरवा स्टेडियम बेंगळूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत ते बेळगाव जिह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.यावेळी किरण जाधव, संभाजी देसाई, ए. बी. शिंत्रे, विश्वास पवार, डॉ. मधुकर देसाई यांच्या हस्ते निवड चाचणी व स्पर्धेचे उद्घाटन केले. विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र आणि पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू मुलांच्या विभागात सक्षम कुंभार तर मुलींच्या विभागात माधुरी पाटील यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.