महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अथणी पोलिसांकडून दोघा मोटारसायकल चोरांना अटक

06:34 AM Oct 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पावणे पाच लाखांच्या 13 मोटारसायकली जप्त

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

दोघा अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करून त्यांच्याजवळून पावणे पाच लाख रुपये किमतीच्या 13 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अथणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

अमोल जितेंद्र पवार, रा. सिंदूर, ता. जत, जि. सांगली, लखन तम्माण्णा सुणगारे, रा. मदभावी, ता. अथणी अशी त्यांची नावे आहेत. अथणी व परिसरातून या जोडगोळीने चोरलेल्या 4 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 13 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र नायकोडी, उपनिरीक्षक एम. बी. बिरादार, पी. नागराज, शिवानंद कारजोळ, आर. एस. वंटगोडी, श्रीमती जे. आर. असुदे, एम. ए. पाटील, एम. बी. महेशवाडगे, जमीर डांगे, इराण्णा मायण्णावर व तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कण्णवर आदींनी ही कारवाई केली आहे.

अथणी येथील छत्रपती शिवाजी चौकाजवळ संशयास्पदरीत्या फिरताना अमोल व लखन यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता विद्यानगरसह विविध ठिकाणी मोटारसायकली चोरल्याची कबुली या जोडगोळीने दिली. मदभावी येथील लखनच्या घरासमोर 6 मोटारसायकली उभ्या करण्यात आल्या होत्या. तर उर्वरित मोटारसायकली कागदपत्रे नंतर देऊ, असे सांगून विकण्यात आल्या होत्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article