For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नववर्षाच्या प्रारंभी आमदार आसिफ सेठ यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

02:00 PM Jan 02, 2024 IST | DHANANJAY SHETAKE
नववर्षाच्या प्रारंभी आमदार आसिफ सेठ यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
आमदार आसिफ सेठ यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
Advertisement

१ जानेवारी रोजी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शहरातील उज्वल नगर आणि अमन नगरला भेट देऊन परिसराची पाहणी केली.या प्रसंगी त्यांनी जनता दरबाराचे आयोजन करून त्या-त्या भागातील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिसरात गटारी आणि इतर प्रकल्पांचे काम सुरू केले आहे. उज्वल नगरमधील काही भागांना चांगल्या रस्त्यांची व पाण्याची योग्य पाइपलाइनची गरज आहे. कारण हा परिसर नुकताच विकसित झालेला आहे.आपल्या या भेटी दरम्यान आमदार आसिफ सेठ म्हणाले आता एक नवीन वर्ष सुरू झाले आहे. आणि शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि बेळगावच्या जनतेची सेवा करण्याचा माझा संकल्प आहे. या भागात पायाभूत सुविधांची वानवा होती. प्रत्येकाला या सुविधा मिळाव्यात.असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या पाहणी दरम्यान परिसरातील नगरसेवक,संबधीत अधिकारी आणि बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.