महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सध्या भाजपचेच पारडे जड : चिदंबरम

06:22 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2024 ची लोकसभा निवडणूक : भाजपच्या राष्ट्रवादाच्या मुद्द्याला पर्याय दिला तरच विरोधकांचा निभाव

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. यानंतर पक्षाने आत्ममंथन सुरू केले असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी छत्तीसगड आणि राजस्थानमधील पक्षाचा पराभव धक्कादायक आणि चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सद्यस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बाजूने वारे वाहत असल्याचे चित्र आहे असे उद्गार त्यांनी काढले आहेत. भाजपच्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर काँग्रेसला उपाय शोधावा लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

भाजप प्रत्येक निवडणूक ही देशाची अखेरची निवडणूक असल्याप्रमाणे लढतो, विरोधी पक्षांनी यातून शिकण्याची गरज आहे. तीन राज्ये छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील विजयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे मनोबल वाढले आहे. आमच्यासाठी छत्तीसगड आणि राजस्थानमधील पराभव चकित करणारा आहे. परंतु चारही मोठ्या राज्यांमध्ये आमच्या पक्षाची मतांची हिस्सेदारी 40 टक्क्यांवर कायम आहे. आमच्या पक्षाचे नेतृत्व लवकरच संबंधित त्रुटी दूर करेल असा विश्वास असल्याचे चिदंबरम म्हणाले.

बूथ व्यवस्थापन आणि निवडणुकीच्या दिवशी निष्क्रीय मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासारख्या मुद्द्यांवर लक्ष देऊन आम्ही लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची मतांची हिस्सेदारी 45 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो अशी मला अपेक्षा असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादाला प्रत्युत्तर शोधावा लागणार

काँग्रेसला भाजपचे ध्रूवीकरण आणि जहाल राष्ट्रवादावर प्रत्युत्तर शोधावा लागणार आहे, तरच भाजपसमोर आव्हान निर्माण करता येणार आहे. भाजपने लोकांना मोफत मिळणाऱ्या गोष्टींच्या विरोधात टिप्पणी करण बंद केल्याने ही एक सुवर्णसंधी आहे. परंतु मी भाजपचे ध्रूवीकरण, मुस्लीमविरोधी प्रचार आणि राष्ट्रवादावरून अधिक चिंतेत आह. काँग्रेसला या मुद्द्यावरून भाजपला घेरावे लागणार असल्याचे चिदंबरम यांनी नमूद केले आहे.

जातनिहाय जनगणनेचा मुद्दा निष्प्रभ

2024 च्या निवडणुकीसाठी जातनिहाय जनगणना मुद्दा महत्त्वपूर्ण असला तरीही तो निवडणूक जिंकवून देणारा ठरु शकत नाही. माझ्या मतानुसार सध्या बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या दोन्ही मुद्द्यांमुळे लोकांना सर्वाधिक चिंता असल्याचे चिदंबरम म्हणाले.

प्रभावी उमेदवारांची ओळख पटविणे

इंडिया आघाडीच्या नेत्यांना किमान 400-425 मतदारसंघांमध्ये भाजपला थेट आव्हान देऊ शकणाऱ्या उमेदवारांची ओळख पटवावी लागणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत होणाऱ्या अंतर्गत चर्चेविषयी मला माहिती नाही. परंतु पुढील लोकसभा निवडणुकीला आता केवळ 3 महिने शिल्लक असल्याचे या आघाडीच्या नेत्यांना माहित आहे. आघाडीच्या नेत्यांबद्दल लोकांच्या प्रतिक्रियेतून पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याची निवड करण्यास मदत होणार आहे, परंतु याहून अधिक गरज आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याची आहे. सरकारचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची निवड निकालानंतर केली जाऊ शकते असे वक्तव्य चिदंबरम यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article