असूस आरओजीची आवृत्ती लाँच
हा फोन मोबाईल गेमिंगसाठी विकसित करण्यात आल्याची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टेक कंपनी असूसने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आरओजी फोन 7 मालिका भातासह तैवान जर्मनी व यूएसच्या बाजारांपेठामध्ये सादर केली आहे. आरओजी हे नाव ‘रिपब्लिक ऑफ गेमर्स’ आहे, हे स्पष्ट आहे, की हा फोन खास मोबाईल गेमिंगसाठी विकसित केला आहे.
आरओजी फोन 7 मालिका स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 एसओसी प्रोसेसर, 165 एचझेड फुल एचडीसह सादर होणार असून यामध्ये 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
किंमत
कंपनीने आपला नवीन गेमिंग फोन दोन मॉडेलमध्ये सादर केला आहे. यामध्ये 12 जीबीची किमत ही 74,999 रुपये तर 16 जीबी रॅम असणारा फोन हा 99,999 रुपयांना मिळणार आहे.
सदरच्या स्मार्टफोनची विक्री ही ऑफलाईन व ऑनलाईन सुरु होणार असून याबाबतची कोणतीही तारीख सादर करण्यात आली नसल्याची माहिती आहे. हा फोन फँटम ब्लॅक आणि स्टॉर्म व्हाईट रंगांमध्ये उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.