For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : पंढरपुरातील भारत विकास परिषदेमार्फत महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत

02:58 PM Oct 12, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   पंढरपुरातील भारत विकास परिषदेमार्फत महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत
Advertisement

               अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनता त्रस्त

Advertisement

पंढरपूर : पंढरपूर सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच भरीव योगदान असलेल्या भारत विकास परिषद पंढरपूर संस्थेच्यावतीने मोहोळ आणि माढा तालुक्यात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तु पुरविण्यात आल्या.

अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतकरी, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून शेतजमिनी, गुरे-ढोरे, पिके, खते, धन-धान्यासाहित विद्यार्थ्यांच्या वह्या-पुस्तकापर्यंत वस्तू पाण्यात वाहून गेली आहेत. संघटनांना मदत करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले होते.

Advertisement

त्यानुसार भारत विकास परिषद पंढरपूर, बिल्डर्सची क्रेडाई संघटना,तिरुपती कन्स्ट्रक्शन पंढरपूर, पालवी सामाजिक संस्था पंढरपूरच्यावतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मागणीनुसार, प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याकडे ४०० कुटुंबाना जीवनावश्यकवस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाविपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेंद्र काणे, रोहिणी कोर्टिकर, सचिव मंदार केसकर, आशिष शहा, अमित शिरगावकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.