For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत

12:21 PM May 20, 2024 IST | VISHAL_G
मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत
Advertisement

कुरणकर कुटुंबीयांकडे आर्थिक मदतीची कागदपत्रे देताना रमाकांत कोंडुसकर, मालोजी अष्टेकर व म. ए. समितीचे पदाधिकारी.

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून सीमाभागातील 865 गावांमधील नागरिकांना आरोग्याच्या सुविधेसाठी आर्थिक मदत केली जात आहे. अळवण गल्ली, शहापूर येथील सुनील कुरणकर यांना हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एक लाख रुपये अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले.

Advertisement

सीमाभागातील नागरिकांना वैद्यकीय उपचार घेणे सोयीचे व्हावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आर्थिक साहाय्य करण्यास सुरुवात केली आहे. उपचारासाठी रितसर अर्ज केलेल्या नागरिकांना महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत पुरविली जात आहे. यापूर्वीही काही नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

सुनील कुरणकर यांच्यावर अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून हॉस्पिटलच्या खात्यामध्ये आर्थिक मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. कुरणकर कुटुंबीयांच्यावतीने म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, नेते रमाकांत कोंडुसकर, प्राचार्य आनंद आपटेकर, अनिल आमरोळे, राजाराम मजुकर, बाबू कोल्हे, श्रीधर खन्नुकर यासह इतर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी व मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सीमा समन्वय मंत्री शंभूराज देसाई, चंदगड येथील भाजप नेते शिवाजी पाटील यांच्या प्रयत्नांतून ही मदत मिळू शकली आहे.

Advertisement
Tags :

.