महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इडीकडून 39.24 कोटीची मालमत्ता जप्त

06:27 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यात मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई : जमीन घोटाळा प्रकरणातील संशयितांच्या 31  मालमत्तांवर टाच

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने(इडी) गोव्यात मोठी कारवाई करत तब्बल 39.24 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत तात्पुरता आदेश जारी करण्यात आला होता, असे केंद्रीय तपास संस्थेने म्हटले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी माहिती देताना सांगितले की, बनावट कागदपत्रांचा वापर करून राज्यात बेकायदेशीरपणे जमिनी हडप करणाऱ्या काही लोकांविरूद्ध मनी लाँड्रिंग तपासणीचा भाग म्हणून ही कारवाई केली. यामध्ये गोव्यातील कोट्यावधी रूपयांच्या 31 स्थावर मालमत्ता जप्त केल्याचे त्यांनी नमूद केले.

संशयितांकडून नातेवाईकांच्या नावे मालमत्तांची बेकायदा नोंद

विक्रांत शेट्टी, मोहम्मद सुहेल, राजकुमार मैथी यांच्यासह गोव्यातील अन्य काही संशयितांच्या बेकायदा स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यापूर्वी गोवा पोलिसांनी बेकायदा जमीन हडप प्रकरणी गुन्हा नोंद केलेल्या विविध तक्रारीतून मनी लाँड्रिंग प्रकरण उद्भवले आहे, असे तपासात आढळून आले आहे. अशा हडप केलेल्या मालमत्ता संशयितांनी स्वत:च्या नावावर किंवा त्यांचे सहकारी किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावावर बेकायदेशीरपणे नोंद केल्याचे समोर आहे, असे ईडीने म्हटले आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे केल्या वारस नोंदी

स्थावर मालमत्ता आपल्या पूर्वजांच्या मालकीच्या असल्याचा दावा करण्याच्या उद्देशाने संशयितांनी जमिनीच्या नोंदींमध्ये ‘बनावट’ कागदपत्रे घुसवली, असे तपासात आढळून आले आहे. या बनावट दस्तऐवजांच्या आधारे ते वारस यादी तयार करून त्यांची नावे जमिनीच्या अद्ययावत नोंदींमध्ये समाविष्ट करू शकले. यातील काही मालमत्ता संशयितांनी गोव्यातील काही जणांना विकल्या आहेत. अशी   बेकायदा मालमत्ता हडप प्रकरणे गोव्यासह इतर राज्यांतही उघड होण्याची शक्यता आहे, असा दावा तपास संस्थेने केला आहे

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article