For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानात लपलेल्या दहशतवादी म्होरक्यांची संपत्ती जप्त

06:11 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात लपलेल्या दहशतवादी म्होरक्यांची संपत्ती जप्त
Advertisement

काश्मीरमध्ये पोलिसांकडून मोठी कारवाई

Advertisement

► वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीर पोलिसांकडून उत्तर काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात दोन स्थानिक दहशतवादी म्होरक्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दोन्ही हँडलर्स सध्या पाकिस्तानात असून तेथून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी गट आणि दहशतवादी मॉड्यूलला संचालित करत असतात.

Advertisement

न्यायालयाकडून संपत्ती जप्त करण्याचा आदेश देण्यात आल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जम्बूर येथील रहिवासी जलाल दीन आणि उरीच्या कमलकोटेचा रहिवासी मोहम्मद साकी अशी या दहशतवादी हँडलर्सची नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या संपत्तींची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे समजते.

यापूर्वी 7 मे रोजी पाकिस्तानात लपून बसलेल्या 7 दहशतवाद्यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. बारामुलामध्ये अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून आदेश देण्यात आल्यावर पोलिसांनी संबंधित कारवाई केली होती. शेखपोरा येथील शब्बीर अहमद सोफी, वारिपोरा पाईनचा रहिवासी गुलाम नबी अलाई, वारपोला बाला येथील गुलाम नबी शेख, रेशीपोरा औथूराचा रहिवासी शरीफ उद दीन चोपन आणि गुल्ला  शेख, सलूसा येथील मोहम्मद रफीक खान आणि फ्रास्टर तिलगामच्या अब्दुल हमीद पर्रे विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. तपासादरम्यान या दहशतवादी म्होरक्यांच्या संपत्तीची ओळख पटली होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.