For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसाम होता म्यानमारचा भाग : सिबल

06:40 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
आसाम होता म्यानमारचा भाग   सिबल
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

भारताचे आसाम राज्य हे म्यानमारचा भाग होते, असे आश्चर्यकारक विधान ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी केले आहे. ते नागरिकत्व कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करत होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपने जोरदार टीका केली असून या विधानांमधून सिबल यांची मानसिकता दिसून येते, अशी टिप्पणी हिमांत बिस्व सर्मा यांनी केली आहे.

आसाम हा म्यानमारचा भाग होता. तो 1824 मध्ये भारताला मिळाला. ब्रिटीशांनी युद्ध करुन तो भाग म्यानमारकडून जिंकल्यानंतर तो त्यांना देण्यात आला आणि नंतर भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो भारताला मिळाला, अशी मांडणी सिबल यांनी केली. अनेक इतिहासतज्ञांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

Advertisement

हे धादांत असत्य

आसाम हा म्यानमारचा भाग होता, हे धादांत असत्य आहे. तो कधीच म्यानमारचा भाग नव्हता. या भागावर जेव्हा ‘अहोम’ समुदायाचे राज्य होते, तेव्हा म्यानमारने आसामवर आक्रमण केले होते. त्यावेळी केवळ दोन महिन्यांसाठी म्यानमारच्या सेनेने येथे वर्चस्व मिळविले होते.

तथापि, नंतर अहोम समुदायाने हा भाग परत मिळवला आणि तेव्हापासून तसेच त्याच्या आधीपासून हा भारताचाच भाग आहे. ज्यांना इतिहास माहीत नाही त्यांनी त्यावर आपले तारे तोडू नयेत, अशी टीका आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी केली आहे.

सैकिया यांचीही टीका

आसामचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते देबव्रत सैकिया यांनीही कपिल सिबल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सिबल यांना एक पत्रच पाठविले असून आसामचा भ्रमित करणारा इतिहास सर्वोच्च न्यायालयात कथन केल्याच्या संदर्भात त्यांच्यावर टीका केली आहे. आपल्याला हा इतिहास बहुतेक जमाते उल इस्लामी आणि आमसू या पक्षाच्या नेत्यांनी शिकविलेला दिसतो, अशी खोचक टिप्पणीही सैकिया यांनी त्यांच्या पत्रात सिबल यांच्यावर केली आहे. सिबल यांनी हे विधान मागे घ्यावे, असा आग्रहही सैकिया यांनी त्यांना केला आहे.

Advertisement
Tags :

.