महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पत्नीच्या मृत्यूनंतर आसामच्या गृह सचिवाची आत्महत्या

06:02 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅन्सरमुळे पत्नीचे झाले निधन : आयपीएस अधिकाऱ्याने स्वत:वर झाडली गोळी

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

Advertisement

आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. गृहसचिव चेतिया यांच्या पत्नीचे कर्करोगामुळे मंगळवारी निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर काही क्षणातच चेतिया यांनी स्वत:चे आयुष्य संपविले आहे. पत्नीवर गुवाहाटीतील ज्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू  होते, तेथेच चेतिया यांनी आत्महत्या केली आहे.

चेतिया यांनी रुग्णालयाच्या आयसीयूमध्येच स्वत:च्या सरकारी रिव्हॉल्वरद्वारे स्वत:वर गोळी झाडून घेतली. तेथेच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. चेतिया यांची पत्नी कॅन्सरने ग्रस्त होती आणि मागील काही महिन्यांपासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या.

आसामचे गृहसचिव चेतिया हे 2009 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी होते. राज्याचे गृहसचिव म्हणून नियुक्त होण्यापूर्वी ते तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच आसाम पोलीस विभागाच्या चौथ्या बटालियनचे कमांडेंट म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article