महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आसामचे राज्यपाल उदयपूरमध्ये, काँग्रेसचा आक्षेप

05:25 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानात मतदानाचा दिवस नजीक आला आहे. याचदरम्यान घटनात्मक पदांवरून राजस्थानात राजकारण सुरू आहे. यापूर्वी काँग्रेसने उपराष्ट्रपतींकडून राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांना निशाणा केले होते. आता याचदरम्यान उदयपूरमध्ये आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या एंट्रीवरून काँग्रेस आक्रमक झाला आहे.

Advertisement

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि उदयपूरमधील उमेदवार गौरव वल्लभ यांनी राज्यपाल कटारिया यांच्या उदयपूर दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. यावरून त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. हा दौरा म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेसने यापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजस्थान दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले होते. तर राज्यपाल कटारिया यांच्या उदयपूर दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Advertisement

आसामचे राज्यपाल कटारिया हे घटनात्मक पदावरआहेत. अशा व्यक्तींनी राजकीय घडामोडींमध्ये सामील होऊ नये. राज्यपाल कटारिया हे उदयपूरमधील भाजप उमेदवार ताराचंद जैन यांच्या समर्थनार्थ बैठक घेण्यासाठी येत आहेत. हा प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असल्याचे गौरव वल्लभ यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article