महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आसाम मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट

11:47 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना राज्यातील अनेक प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीसाठी आसाममध्ये येण्याचे निमंत्रण दिले. राज्यातील कामाख्या कॉरिडॉर प्रकल्प पायाभरणी, जोरहाटमधील बीर लचितचा भव्य पुतळा राष्ट्रार्पण सोहळा, तिनसुकिया मेडिकल कॉलेजचे उद्घाटन आणि शिवसागर मेडिकल कॉलेजची पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच 2024 मध्ये आसाममध्ये बिझनेस समिट आयोजित करण्यात येणार आहे. त्याबाबतही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.  राज्याकडे खासगी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने राज्यात बिझनेस समिटचे आयोजन करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article