कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिसरे रेल्वेगेट उड्डाण पुलावर डांबरीकरण

11:03 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाण पुलावरील डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मागील वर्षीच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहने चालविताना गैरसोय होत होती. सोमवारी रात्री रस्ता बंद ठेवून डांबरीकरण करण्यात आले. मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तिसरे रेल्वे गेट उड्डाण पुलावर मागील दोन वर्षांत मोठे खड्डे पडले होते. पहिल्याच वर्षी पावसामुळे रस्ता खचल्याने खड्डे पडले होते. दोन ते तीनवेळा हे खड्डे भरण्याचा प्रयत्न झाला. परंतु सततच्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडत होते. तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुन्हा खड्डे पडल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. मागीलवर्षी उड्डाण पुलावरील वाहतूक थांबून ज्या ठिकाणी खड्डे पडले होते. तेथे काँक्रीट भरण्यात आले होते.

Advertisement

डांबरीकरण केल्याने नागरिकांतून समाधान

Advertisement

उड्डाण पुलाच्या मध्यावर रस्ता उखडून गेला होता. यावर्षी पुन्हा खड्डे पडू नये, यासाठी डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मंगळवारी सकाळपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम झाले. त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण झाले नसले तरी ज्या ठिकाणी खड्डे पडले होते. त्या ठिकाणचा अधिकतर भाग डांबरीकरण करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article