दुसरे रेल्वेगेट रस्त्याचे डांबरीकरण
वाहनचालकांमधून समाधान
बेळगाव :
टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट येथे ख•dयामुळे वाहने ये-जा करताना अडथळा निर्माण होत होता. नैऋत्य रेल्वेने हा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न बुधवारी केला. रेल्वे गेटजवळील रस्त्याचे डांबरीकरण केल्याने रस्ता वाहतुकीसाठी सुलभ झाल्याने वाहन चालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
टिळकवाडी परिसरात अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. पहिले रेल्वेगेट येथे बॅरिकेड्स असल्याने सर्रास वाहतूक दुसऱ्या रेल्वेगेटमार्गे होते. परंतु याठिकाणी ख•ा पडल्यामुळे वाहनांची ये-जा करताना अडचणी येत होत्या. अवजड वाहने या ख•dयांमध्ये अडकून वाहतुकीची कोंडी होत होती. याठिकाणी रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी पालक व नागरिकांतून नैऋत्य रेल्वेकडे करण्यात आली होती.
बुधवारी सकाळी नैऋत्य रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य प्रसाद कुलकर्णी, कंत्राटदार लीला कृष्णा रे•ाr, उपमहापौर आनंद चव्हाण, वसंत हेब्बाळकर, किशोर कालकुंद्रीकर, संजीव मारिहाळ, संतोष होसमनी, सुधीर कुलकर्णी यांनी पाहणी केली. त्यानंतर काही वेळात जेसीबीने माती टाकून त्यानंतर डांबरीकरण करण्यात आले.