कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उचवडे रस्त्याचे डांबरीकरण करा

12:36 PM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकऱ्यांची मागणी : आमदार विठ्ठल हलगेकर यांना दिले निवेदन

Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

उचवडे गावाकडे जाणाऱ्या मुख्य व शिवारातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक धोकादायक बनले आहे. तसेच गावापासून ओलमणीकडे जाणाऱ्या शिवारातील कच्च्या रस्त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. सध्याही हा रस्ता कच्च्या स्वरुपाचाच आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी उचवडे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांना तीन दिवसापूर्वी भेटून सदर रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

बेळगाव-चोर्ला रोड उचवडे क्रॉसपासून उचवडे गावाकडे रस्ता जातो. तसेच हाच रस्ता गावातून शेतवाडीतून ओलमणीपर्यंत जातो. उचवडे गावासाठी हा मुख्य रस्ता मात्र चोर्ला रोडपासून गावापर्यंतच्या रस्त्याचे गेल्या पाच वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. तर गावापासून ते ओलमणीपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. चोर्ला रोडपासून गावापर्यंत असलेल्या रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. उचवडेसह या भागातील वाहनधारक तसेच शेतकऱ्यांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र या खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक करणे अवघड झाले आहे.

उचवडे गावापासून ओलमणीपर्यंत जाणारा शेतवडीतील रस्ता हा गावासाठी महत्त्वाचा आहे. शेतकरी रोज आपल्या शेत शिवारात याच रस्त्याने ये-जा करतात. मात्र कच्च्या रस्त्यावरून शेतकऱ्यांना यावे लागते. उचवडे गावापासून ओलमणी क्रॉसपर्यंत सुमारे साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे. तर गावापासून दीडकिलोमीटर अंतरावर मलप्रभा नदी लागते. याठिकाणी पूल बांधण्याची गरज आहे. पावसात नदीला पाणी आल्यानंतर गावापासून ओलमणी गावापर्यंतचा हा रस्ता वाहतुकीला पूर्णपणे ठप्प होतो.

उचवडे गावातील कामगार वर्ग तसेच गावकरी बेळगावला ये-जा करण्यासाठी उचवडे गावापासून चोर्ला रोड किणयेमार्गे वाहतूक करतात. दुचाकी व अन्य वाहने या रस्त्यावरूनच धावतात. कारण गावापासून ओलमणीकडे जाणारा रस्ता कच्च्या स्वरुपाचा असल्यामुळे याचा केवळ शिवाराकडे जाण्यासाठी पायवाट म्हणून उपयोग होतो. या रस्त्यावरून शेतकऱ्यांना बैलगाडी घेऊन जावे लागते. मात्र सध्याच्या रस्त्याची परिस्थिती पाहता बैलगाडी घेऊन जाणेही अवघड बनली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना विजय निंबाळकर, महादेव खोत, महेश भातकांडे, सुरज जाधव, योगेश बांदिवडेकर व अंकुश कामत आदींसह शेतकरी उपस्थित होते.

आधिवेशन संपल्यानंतर आमदार स्वत: भेट देणार

या रस्त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदारांना निवेदन दिले. सध्या बेळगावचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर उचवडे गावातील रस्त्याची पाहणी करून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून लवकरच कामकाज सुरू करणार असल्याचे आश्वासन आमदार हलगेकर यांनी दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article