महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वारखंडे-फोंडा येथे रस्त्यावर डांबर वितळणाऱ्या मशिनला आग

11:40 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू असताना घटना

Advertisement

फोंडा : फोंडा-पणजी महामार्गावरील वारखंडे येथील फोंडा अग्निशामक दलासमोर रस्त्याचे काम सुरू असताना अचानक डांबर वितळणाऱ्या मशिन पेट घेतल्याने भर दुपारी गोंधळ उडाला. फोंडा अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यात महत्चाचे मदतकार्य केले. सदर घटना काल गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली. वारखंडे येथील अंगारकी इमारतीसमोर रस्ता रूदीकरण व डांबरीकरणाचे काम भर दुपारी सुरू होते. डांबर वितळण्याचे मशिनात डांबरचे बॅरल डांबर वितळण्यासाठी ठेवले होते. अतिउष्णतेमुळे अचानक मशिनने पेट घेतला. कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न असफल ठरला. काहीवेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. भर रस्त्यावर आगीचे लोट सर्वत्र पसरले. कंत्राटदारांनी त्वरीत अग्निशामक दलाला पाचारण केल्याने परिस्थिती आटोक्यात आणली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article