निवडणूका जवळ आल्या की अत्तराच्या कंपनीची घोषणा होते
आधीच्या घोषणांचं काय हे त्यांनाच विचारा ; राजन तेलींचा केसरकरांना टोला
सावंतवाडी प्रतिनिधी
आता निवडणूक जवळ येऊ लागली आहे. त्यामुळेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अत्तराची कंपनी उभारणार अशा घोषणा आता होऊ लागल्या आहेत. पूर्वीच्या घोषणांचं काय हे त्यांनाच विचारा. मात्र , भाजपचे सावंतवाडी प्रतिनिधी आता निवडणूक जवळ येऊ लागली आहे त्यामुळेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अत्तराची कंपनी उभारणार अशा घोषणा आता होऊ लागल्या आहेत पूर्वीच्या घोषणांचं काय हे त्यांनाच विचारा असा टोला राजन तेली यांनी मंत्री दीपक केसरकर यांना लगावला . मात्र भाजपचे कार्यकर्ते शत प्रतिशत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने तयार आहेत आणि. आम्ही तशी तयारी सुरू केली आहे. जरी आमची राज्यात महायुती असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही शत प्रतिशत भाजप म्हणूनच काम करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे . ही वस्तुस्थिती आहे. मात्र ,येथे महिन्याभरात आरोग्याचा प्रश्न निश्चितपणे सुटेल. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्या दृष्टीने तशा सूचनाही केल्या आहेत अशी माहिती भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ,माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले . श्री तेली म्हणाले सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो मात्र आम्ही पक्ष म्हणून निवडणूक लढवणारच. कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आमचा मित्र पक्ष आपल्या परीने आपापल्या घोषणा करत आहेत. असेही ते म्हणाले. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर ,दादा परब, माजी नगरसेवक आनंद नेवगी, बाबा काणेकर आधी उपस्थित होते . श्री तेली यांनी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.