महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जीएसआय महासंचालकपदी असित साहा

06:30 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये अग्रगण्य भूमिका : जनार्दन प्रसाद यांचे घेतले स्थान

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

असित साहा यांना भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणचे (जीएसआय) नवे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महासंचालक म्हणून साहा यांनी या 175 वर्षे जुन्या राष्ट्रीय संस्थेचा कार्यभार स्वीकारला. या संस्थेचे मुख्यालय कोलकात्यात आहे.

साहा यांनी जनार्दन प्रसाद यांचे स्थान घेतले आहे. बिहारच्या औरंगाबादचे रहिवासी असलेले प्रसाद हे सुमारे 15 महिन्यांपर्यंत या पदावर राहिल्यावर आणि जीएसआयमधील स्वत:च्या दीर्घ सेवेनंतर शनिवारी सेवानिवृत्त झाले. वरिष्ठ भूशास्त्रज्ञ साहा यांनी जीएसआयमधील तीन दशकांच्या आकर्षक कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये मोठी भूमिका बजावली आहे.

साहा यांच्या नेतृत्वात खनिज शोध, संशोधन आणि विकासात जीएसआयच्या मोहिमेला आणखी पुढे नेता येईल आणि जागतिक व्यासपीठावर एक अग्रगण्य भू-वैज्ञानिक संघटनेच्या स्वरुपात स्वत:ची स्थिती मजबूत करता येईल अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे. कार्यभार स्वीकारल्यावर साहा यांनी जीएसआयच्या सर्व मोहिमांसाठी परिणामोन्मुख दृष्टीकोनाच्या महत्त्वावर जोर दिला आहे.

एकजूट प्रयत्नाचे आवाहन

साहा यांनी स्वत:च्या संबोधनात जीएसआय कर्मचाऱ्यांना एकजूट प्रयत्नाचे आवाहन करत प्रत्येक मोहिमेवर मिळून काम करण्यावर जोर दिला आहे. विविध मोहिमा, विशेषकरून महत्त्वपूर्ण भूभौतिकीय घटकयुक्त मोहिमांदरम्यान ताळमेळीच्या महत्त्वाला त्यांनी रेखांकित केले.  तसेच समग्र दक्षता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी विविध घटकांदरम्यान नियमित संवादाच्या आवश्यकतेवर त्यांनी जोर दिला आहे. प्राथमिक लक्ष्य खनिजांचा शोध आणि संबंधित कार्यक्रमांवर असेल, परंतु जीएसआयच्या सर्व मोहिमा समग्र स्वरुपात जोडल्या गेलेल्या आहेत आणि समान स्वरुपात महत्त्वपूर्ण आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. साहा यांना खनिजांचा शोध आणि अध्ययनात मोठा अनुभव आहे आणि ते विविध धातूंच्या व्यापक खनिज खननकार्याशी जोडलेले राहिले आहेत.

कोलकात्यात मुख्यालय

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ही संस्था केंद्रीय खाण मंत्रालयाशी संबंधित आहे. याचे मुख्यालय कोलकात्यात असून लखनौ, जयपूर, नागपूर, हैदराबाद, शिलांग आणि कोलकात्यात याची 6 क्षेत्रीय कार्यालये आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article